मोमोज खाणं पडू शकतं महागात; वेळीच सावध व्हा, नाहीतर..

eating momos is bad for your health
eating momos is bad for your health
Updated on

मोमोज हे नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना? नेपाळची असलेली ही डिश आज सगळीकडे तुफान लोकप्रिय आहे. तरुणाईमध्ये तर या पदार्थाची विशेष क्रेझ आहे. मोदकाप्रमाणेच दिसणारा हा पदार्थ  मैदा आणि भाज्यांपासून तयार केला जातो. आजकाल मोठमोठ्या हॉटेलपासून ते रस्त्याच्याकडेला असलेल्या स्टॉलवरही मोमोज सहज मिळतात. काही ठिकाणी खास मोमोजचे फेमस स्टॉल्सदेखील आहेत. भारतात जितक्या आवडीने मोदक खाल्ले जातात, तितक्यचा आवडीने मोमोजही खाल्ले जातात. मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला लहान लहान गाड्यांवर मोमोज मिळतात. परंतु, हे मोमोज खाणं आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे का? तुम्ही कधी हे तपासून पाहिलं आहे का? रस्त्यावर सहज २०-३० रुपयांना मिळणारे मोमोज खाणं हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. कारण, अनेकदा हे मोमोज तयार करताना अस्वच्छता आणि भाज्या कच्च्या वाफवल्यामुळे शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वस्तात किंवा रस्त्यावर मिळणारे मोमोज का खाऊ नये हे जाणून घेऊयात.

१. मैद्याऐवजी रिफाइंड पीठ वापरणे -

मोमोज हे कायम मैद्यापासून तयार केले जातात. मात्र, बाजारात मिळणारे मोमोज रिफाइंड पीठापासून तयार केले जाता. ज्यात एजोडीकाब्रोनामाइड, क्लोरिनगॅस, बेंजॉइल पेरॉक्साइड आणि अन्य काही रासायनिक पदार्थ वापरण्यात आले असतात. या सगळ्या घटकांमुळे मोमोजची चव वाढते. मात्र, ते शरीरासाठी हानिकारक आहे. विशेष म्हणजे अशा मोमोजचं जास्त सेवन केल्यास मधुमेहासारख्या आजाराला निमंत्रण मिळू शकतं.

२. कच्च्या भाज्या-

बऱ्याचदा हे मोमोज करण्याची घाई असल्यामुळे त्यातील भाज्या या अर्धवट शिजवल्या जातात. तसंच त्या व्यवस्थित धुवून किंवा स्वच्छ करुनही घेतलेल्या नसतात. त्यामुळे यातून अनेकदा पोटाचे विकार होतात.

३. तिखट चटणी- 

मोमोजसोबत देण्यात येणारी लाल रंगाची चटणी ही अनेकांना आवडते. मात्र, ही चटणी तयार करतांना त्यात मोठ्या प्रमाणावर लाल मिरचीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मूळव्याध किंवा अन्य शारीरिक तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते.

४. वजन वाढणे -

मोमोज खाल्लामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. यात मोनो सोडिअम ग्लूटामेट असतो. ज्यामुळे वजन वाढते. त्याचसोबत पचनक्रिया, छातीत दुखणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

५.  कच्चा कोबी -

अनेकदा मोमोज तयार करतांना त्यात  वापरण्यात येणारा कोबी कच्चाच ठेवला जातो किंवा तो व्यवस्थित स्वच्छही केला जात नाही. अनेकदा त्यात असलेल्या आळ्याही तशाच राहतात. त्यामुळे  मस्तिष्कला इजा पोहोचण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com