Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : नव्या वर्षात अशा पद्धतीने सेट करा तुमचे स्किनकेअर रूटीन

या नवीन वर्षात खास त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किनकेअर रूटीन फॉलो करा. यामुळे, तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल आणि त्वचेचे आरोग्य देखील चांगले राहिल.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : आजपासून २०२४ या नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. या नव्या वर्षात अनेक प्रकारचे संकल्प केले जातात. विविध प्रकारचे प्लॅन्स आखले जातात. आरोग्यविषयक आणि अर्थविषयक गोष्टींचे नियोजन केले जाते.

मात्र, त्वचेच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. महिलांनी त्वचेची देखील काळजी घ्यायला हवी. त्यामुळे, या नवीन वर्षात खास त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किनकेअर रूटीन फॉलो करा.

या स्किनकेअर रूटीनमुळे त्वचेची काळजी घेतली जाईल आणि तुम्हाला त्वचेच्या समस्या देखील भेडसावणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात या स्किनकेअर रूटीनबद्दल.

स्किनकेअर रूटीन खालीलप्रमाणे :

त्वचा स्वच्छ करा

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे महत्वाचे आहे. यासाठी, तुम्ही सकाळी उठल्यानंतर फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवा. तुमच्या त्वचेला सूट होणारा किंवा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशची निवड करा आणि त्याने चेहरा स्वच्छ करा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही क्लिजिंग मिल्कचा ही वापर करू शकता.

टोनर

टोनरचा वापर हा त्वचेमधील घाण स्वच्छ करण्यासाठी केला जातो. खास करून चेहऱ्यावरील रोमछिद्रांमध्ये अडकलेली घाण, धूळ आणि मृत त्वचा साफ करण्यासाठी टोनर फायदेशीर आहे. त्यामुळे, तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या आणि तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या टोनरचा वापर करू शकता. टोनरमुळे त्वचा ओलसर राहण्यास मदत होते.

मॉईश्चरायझर

टोनरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. मॉईश्चरायझरमुळे त्वचा मऊ होते, शिवाय त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. खास करून हिवाळ्यात मॉईश्चरायझरचा वापर करायला अजिबात टाळाटाळ करू नका.

मात्र, जर तुमची त्वचा ही कोरडी असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉईश्चरायझरचा वापर करा आणि जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड आधारित मॉईश्चरायझरचा वापर करा.

सनस्क्रिन

चेहऱ्यावर मॉईश्चरायझरचा वापर केल्यानंतर सनस्क्रिन लावायला अजिबात विसरू नका. जसे आपल्या शरीरासाठी श्वास घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. अगदी तसेच आपल्या चेहऱ्यासाठी सनस्क्रिन हे अतिशय महत्वाचे आहे.

घराबाहेर पडताना आवर्जून याचा वापर करा. सनस्क्रिनमुळे चेहऱ्याचे उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण होते आणि त्वचा टॅन किंवा काळी पडण्यापासून त्वचेचा बचाव होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT