Winter Skin Care
Winter Skin Careesakal

Winter Skin Care : हिवाळ्यात अंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज का येते? जाणून घ्या 'ही' कारणे

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्यामुळे, अनेक समस्या निर्माण होतात.
Published on

Winter Skin Care : हिवाळा सुरू झाला की, वातावरणात अनेक बदल होतात. या वातावरणातील बदलांचा परिणाम मग आपल्या आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होतो. या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी आपण घेतो.

मात्र, त्वचेची आणि केसांची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये अंघोळ केल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. जसे की, अंघोळ केल्यानंतर त्वचेवर लाल रॅशेस येणे, पुरळ येणे किंवा खाज येण्याची समस्या निर्माण होते.

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर आपण ऊबदार कपडे घालतो. हे ऊबदार कपडे घातल्यानंतर त्वचेमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. हा कोरडेपणा वाढला की मग त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

जर तुम्हाला ही हिवाळ्यात अंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज येण्याचा त्रास होत असेल, तर त्यामागील कारणे कोणती? ते आज आपण जाणून घेऊयात.

Winter Skin Care
Winter Skin Care : अंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज सुटते; मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

साबणाचा जास्त वापर

अंघोळ करण्यासाठी अनेक जण बॉडीवॉश किंवा साबणाचा वापर करतात. प्रामुख्याने लोक साबणाचा अधिक वापर करतात. परंतु, अंघोळीसाठी साबणाचा जास्त वापर केल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तसेच, त्वचेवर अ‍ॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होतो.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हायपोअ‍ॅलर्जेनिक घटकांनी युक्त असलेला बॉडीवॉश किंवा साबणाचा वापर करावा. ज्यामुळे, त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेवर छान चमक येते.

गरम पाण्याने अंघोळ करणे

अनेक जण हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतात. परंतु, गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेची आर्द्रता हिरावून घेतली जाते. त्यामुळे, त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.

हे नैसर्गिक तेल निघून गेल्यामुळे, त्वचेतील कोरडेपणा वाढतो. हा कोरडेपणा वाढल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये मग खाज येणे या समस्येचा ही समावेश आढळतो. त्यामुळे, ही समस्या टाळण्यासाठी अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉईश्चराईझ करायला विसरू नका.

त्वचा टॉवेलने स्वच्छ करणे

अंघोळ केल्यानंतर काही जण टॉवेलच्या मदतीने त्वचा पूर्णपणे स्वच्छ करतात. परंतु, टॉवेलने त्वचा स्वच्छ करणे हे साफ चुकीचे आहे. कारण, टॉवेलच्या मदतीने जेव्हा त्वचा स्वच्छ केली जाते, तेव्हा त्वचेतील कोरडेपणा हळूहळू वाढतो. या कोरडेपणामुळे मग त्वचेवर खाज येण्यास सुरूवात होते.

त्वचेवर खाज येण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे, त्वचेवर टॉवेलचा वापर करणे टाळा, त्याऐवजी नॅपकिनचा वापर करा आणि त्वचा हलक्या हाताने टिपून घ्या. त्यामुळे, त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Winter Skin Care
Pineapple Face Packs : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अननसाची घ्या मदत, बनवा ‘हे’ फेसपॅक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com