Relationship Tips google
लाइफस्टाइल

Relationship Tips : मुलांच्या या सवयींवर भाळतात मुली; लगेच पडतात प्रेमात

प्रत्येक मुलीला वाटते की तिच्या जोडीदारामध्ये अशा सवयी असाव्यात. लक्षणीय बाब म्हणजे अशाच काही मुलांच्या सवयींवर मुली लवकर भाळतात.

नमिता धुरी

मुंबई : मुलींना एखादी गोष्ट खटकली असेल किंवा एखाद्याची एखादी गोष्ट, सवय आवडली असेल तर त्या सर्व काही त्यांच्या मनात ठेवतात किंवा त्यांच्या खास मैत्रीणींना ते सांगत असतात. दरम्यान मुलांच्या काही सवयी असतात ज्या मुलींना खूप आवडतात. प्रत्येक मुलीला वाटते की तिच्या जोडीदारामध्ये अशा सवयी असाव्यात. लक्षणीय बाब म्हणजे अशाच काही मुलांच्या सवयींवर मुली लवकर भाळतात.  हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

महिलांसह सर्वांचा आदर करणे - मुलींना मुलांची ही सवय खूप आवडते. जी मुले सर्व लोकांचा आदर करतात, मुलींना फक्त त्यांच्याशीच मैत्री करायला आवडते. सर्वांचा सन्मान आणि आदर करणारा मुलगा कधीच चुकीचे वागू शकत नाही याची त्यांना कल्पना असते. 

काळजी घेणारे - काळजीवाहू स्वभावाची मुले मुलींना खूप आवडतात. मुली अशा मुलांच्या शोधात असतात जे त्यांची काळजी घेतील आणि त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतील.

प्रामाणिकपणा - मुलींना मुलांनी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करणे आवडते. दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट न करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

स्वच्छतेकडे लक्ष देणारे - मुलांनीही आपल्याप्रमाणे स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे बहुतांश मुलींना वाटत असते. मुलांच्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा जास्त मुली त्यांच्या या सवयीने प्रभावित होतात.

भावनिकदृष्ट्या मजबूत - मुलींना भावनिकदृष्ट्या मजबूत असलेली मुले आवडतात. निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या मुलांपासून मुली दूर राहणे पसंत करतात. 

दुसऱ्यांचे लक्षपूर्वक ऐकणारे - मुलींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्याकडे लक्ष देणारी मुले त्यांना खूप आवडतात. फक्त स्वतःच सतत बोलणे आणि समोरच्याचे काही न ऐकणे, अशा वृत्तीच्या मुलांचा मुलींना राग येतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT