Relationship tips | नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship tips

Relationship tips : नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे...

मुंबई : रिलेशनशिपमध्ये असताना जोडप्याला जोडीदाराची साथ मिळते. प्रेमळ जोडपे किंवा पती-पत्नीला एकमेकांच्या सोबतीमुळे एकटेपणा जाणवत नाहीत. पण बऱ्याच वेळा लोकांना नात्यात एकटेपणा आणि निराशा वाटू लागते. एकटेपणा वाढला की नाती पोकळ होऊ लागतात.

तुमच्या जोडीदाराप्रती तुमच्या भावना बदलू लागतात. लोक तणावग्रस्त होतात. नातेसंबंधात एकटेपणा जाणवणारे लोक स्वतःला विचारतात की ते त्यांच्या जोडीदारासोबत असतानाही त्यांना एकटे का वाटते.

हा दोष कोणाचा आणि एकटेपणा दूर करण्यासाठी काय करावे ? जर तुम्हीही एखाद्या नात्यात असाल पण तरीही एकटेपणा वाटत असेल तर त्याची कारणे आणि एकटेपणावर मात करण्यासाठी टिप्स जाणून घ्या.

हेही वाचा: Relationship tips : लैंगिक जीवन समाधानी करण्यासाठी पुरुषांनी करावीत ही कामे

नातेसंबंधात एकटेपणा जाणवण्याची कारणे

जोडीदाराकडून अपेक्षा

जेव्हा लोक त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा ठेवू लागतात परंतु ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, तेव्हा तुमची निराशा होते. जोडीदारावर जास्त अवलंबून राहणे आणि त्यांची उदासीनता तुम्हाला एकाकी बनवते.

भावनिकतेचा अभाव

जेव्हा नात्यात भावनिकतेचा अभाव असतो तेव्हा एकटेपणा जाणवतो. जर तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध चांगले नसेल तर तुम्ही एकमेकांना नीट समजून घेत नाही आणि नात्यात एकटेपणा वाढू लागतो.

वेळ देत नाही

काही वेळा व्यग्र जीवनशैलीमुळे लोक जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्यात फारशी चर्चा किंवा भेटीगाठी होत नाहीत. अशा परिस्थितीत जोडीदार आपल्या व्यग्र जोडीदाराची वाट पाहात असतो आणि स्वत:चा एकटा विचार करू लागतो. त्याला त्याच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असतो पण त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळ नसतो.

हेही वाचा: Relationship Tips : या ‘पाच’ चुका टाळा नाहीतर तुमचे लैंगिक जीवन उध्वस्त होईल

एकाकीपणावर मात करण्याचे मार्ग

नात्यात सर्व काही ठीक होत नसेल, तरच लोकांना एकटेपणा जाणवतो. जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराशी बोला आणि नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

जोडीदारासोबत फिरायला जा. त्यांच्यासोबत थोडा वेळ एकांत घालवा. यामुळे एकटेपणा दूर होऊ शकतो. जर तुम्हाला नात्यात एकटेपणा वाटत असेल तर मित्रांशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :Relationship Tips