Glowing Skin Tips esakal
लाइफस्टाइल

Glowing Skin Tips : इंस्टंट ग्लो हवाय? ट्राय करा हे 7 फेसपॅक

बाहेरच्या प्रदूषणाचा थेट परिणाम चेहऱ्यावर

सकाळ डिजिटल टीम

Glowing Skin Tips : आजकाल लोकांचं डेली रूटीनच नाहीये; पूर्वीच्या वेळी लोकं लवकर उठून व्यायाम करायची, सकाळी फिरायला जायची, वेळोवेळी नाश्ता जेवण झोप घेयचेत, पण आता यात सातत्य नाही, आणि याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो.

शिवाय बाहेरच्या प्रदूषणाचा सुद्धा थेट परिणाम चेहऱ्यावर होतो. चेहऱ्याची त्वचा निस्तेज होऊ लागते. आपण विचार करतो की पार्लर ला जाऊन फेशियल केलं तर यातून सुटका होईल तसा याने फरक दिसतो पण खरतर कोणतंही केमिकल हे चेहऱ्यासाठी घातक असतच. अशात काय करावं असा प्रश्न पडला असेल ना?

कोणत्याही महागड्या आणि घातक पार्लर ट्रीटमेंट घेण्याऐवजी ट्राय करा हे घरीच बनवलेले फेस पॅक

1. पपई फेस पॅक

पपई मध्ये व्हिटॅमिन ए चे गुणधर्म आढळतात; त्वचा मॉइश्चराईझ होते आणि टॅनिंग पण कमी होते. पपईच्या गरामध्ये गुलाबजल टाकून पेस्ट तयार करून घ्या आणि मग चेहर्या त्याचा पॅक लावा. 15 ते 20 मिनिट राहूद्या आणि मग चेहरा पाण्याने धुवून घ्या.

2. कॉफी फेस पॅक

कॉफीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रिंकल्स येत नाहीत; शिवाय चेहराही तजेलदार दिसतो. कॉफी मध्ये थोडं गुलाबजल किंवा दूध टाकून चेहऱ्याला लावू शकतात.

3. मुलतानी माती फेस पॅक

मुलतानी माती फेस पॅकमध्ये मॉइश्चरायझिंग आणि रींकल्स पासून वाचण्याचे गुणधर्म आहेत. मुलतानी मातीमध्ये खोबरेल तेल मिसळून फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर लावा.

4. जास्वंदाचा फेस पॅक

रींकल्स आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, जास्वंदाचा फेस पॅक लावल्याने स्किन एजिंगची लक्षण कमी होतात. जास्वंदाची पेस्ट बनवून घ्या त्यात 2 चमचे बेसन आणि 2 चमचे दही टाकून छान मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

5. डाळिंबाचा फेस पॅक

डालिंबामध्ये प्युनिक अॅसिड आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्याचा फेसपॅक लावल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते. डाळिंबाचे दाणे बारीक करून त्यात मध मिसळून चेहऱ्याला लावा.

6. कोरफडीचा फेस पॅक

कोरफडीचे फायदे जगजाहीर आहेत; यामुळे चेहऱ्याची आर्द्रता कायम राहते. डेड स्किन निघून जाते. एलोवेरा जेलमध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा.

7. मध फेस पॅक

मधाचा फेस पॅक लावल्याने त्वचेला बॅक्टेरिया निघून जातो, डेड स्किन निघते. त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खाज येण्यापासून आराम देतात. चेहऱ्यावर मध लावून मालिश केल्याने खूप फरक पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT