
दिवाळीत Glowing Skin हवीयं: डायटमध्ये 'या' टिप्स फाॅलो करा
दिवाळी जवळ आली की, थंडीचे प्रमाण वाढते आणि स्किन कोरडी पडण्यास सुरूवात होते. आपल्या डायटमध्ये बदल झाला असेल तर याचा थेट परीणाम स्किनवर होतो. या दिवाळीला जर तुम्हाला तुमची स्किन साॅफ्ट ठेवायची असेल तर खाण्यात थोडे बदल करणे गरजेचे आहे. तुमच्या डायटमध्ये ताजी फळे, भरपूर पाण्याचा समावेश करा. याशिवाय काही गोष्टी टाळल्यास या दिवाळीत तुमची स्किन ग्लो होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया डायटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
डायटमध्ये ताज्या फळांचा समावेश करा
स्किनचा कोरडेपणा घालवण्यासाठी डायटमध्ये व्हिटामिन ए, सी, आणि ई चा वापर भरपूर करा. हंगामी ताजी फळे तुमच्या स्किन ला प्रोटीन आणि व्हिटामिन देतात.
साखर खाण्याचे प्रमाण कमी करा
खाण्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. साखर खाणे कमी केल्यामुळे इन्सुलिनची पातळी कमी होत जाते. ज्यामुळे पेशींचे संतुलन राखण्यास मदत होते.
तळलेले पदार्थ टाळा
तळलेले पदार्थ खाण्यास टाळले पाहिजेत. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. तळलेले पदार्थ खाल्याने स्किनला अॅलर्जी होऊ शकते. दिवाळीसाठी जर तुम्हाला स्किन चांगली करायची असेल तर आत्ताच डायटमधून असे पदार्थ कमी करा.
बॉडीला हाइड्रेट ठेवा
त्वचेला उजळपणा आणायचा असेल तर स्किनला हायड्रेट ठेवा. यासाठी नियमित पाणी योग्य प्रमाणात पिणे गरजेचे आहे. कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या. याशिवाय डायटमध्ये टरबूज, संतरे,स्ट्रॉबेरी , द्राक्षे, भरपूर पाणी असलेली फळे आणि पालेभाज्या याचा समावेश करा.
झोप आहे गरजेची
स्किन ला ग्लो आणण्यासाठी नियमित रात्री कमीतकमी आठ तास झोपण्याचा प्रयत्न करा. जसे शरीर थकते तसा चेहराही थकतो. आणि ढिला पडतो. तुम्हाला जर नैर्सगिक चेहरा शांत आणि चांगला ठेवायचा असेल तर झोप गरजेची आहे.
Web Title: Glowing Skin Diwali Festive Five Diet Tips Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..