Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : कंडिशनरचा वापर केल्यानंतरही केस कोरडे राहतात? मग, 'या' घरगुती उपायांची घ्या मदत

Hair Care Tips : कंडिशनरचा वापर केल्यानंतर केस अनेकदा मऊ सिल्की होतात तर कधीकधी केस कोरडे देखील होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : केस निरोगी ठेवण्यासाठी केसांची योग्य प्रकारे निगा राखणे गरजेचे आहे. त्यासाठी केसांना वेळेवर तेल लावणे, केसांना सूट होणारा शॅंम्पू आणि कंडिशनरचा वापर करणे, केसांमधील गुंता काढणे, केसांचा धूळ-प्रदूषणपासून बचाव करणे, इत्यादी गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.

आजकाल महिला केसांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे शॅंम्पू वापरतात. तसेच, केस धुतल्यानंतर, केसांमधील सिल्कीनेसपणा टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. कंडिशनरचा वापर केल्यानंतर केस अनेकदा मऊ सिल्की होतात तर कधीकधी केस कोरडे देखील होतात.

या कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या मदतीने तुम्ही कोरड्या केसांची समस्या दूर करू शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

केळी

केळी आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. केळ्यांचा वापर तुम्ही कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही एक पिकलेले केळ घ्या. आता हे केळ स्मॅश करून घ्या.

या स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये २ चमचे मध आणि ७-८ चमचे नारळाचे तेल मिसळा. आता हे मिश्रण चांगले एकत्र करून केसांना लावा. अर्ध्या तासापर्यंत हे मिश्रण केसांमध्ये लावून ठेवा. त्यानंतर, केस धुवा. यामुळे, केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.

नारळतेल आणि कापूर

केसांच्या वाढीसाठी आणि केसांना योग्य पोषण मिळवून देण्यासाठी नारळतेल अतिशय लाभदायी आहे. नारळाचे तेल केसांना लावल्याने केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. शिवाय, खराब केसांची ही समस्या दूर होते. केसांमधील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही नारळतेल आणि कापूरचा उपाय करू शकता.

यासाठी नारळतेल एका वाटीत घेऊन हलके गरम करा. आता या तेलामध्ये १-२ कापूर घाला. कापूर त्यात विरघळल्यानंतर या कोमट तेलाने केसांना छान मसाज करा. अर्धा तास केस तसेच ठेवा. त्यानंतर, केस शॅंम्पूच्या मदतीने धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा हा उपाय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT