Hair Care Tips : कलर केलेल्या केसांवर 'या' गोष्टींचा वापर करणे टाळा, केस होऊ शकतात खराब

Hair Care Tips : कलर केलेल्या केसांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली तर केस छान मेंटेन राहतात.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal

Hair Care Tips : आजकाल केसांची खास स्टाईल करण्यासाठी विविध प्रॉडक्ट्स बाजारात येत आहेत. या प्रॉडक्ट्सचा आणि हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर महिलांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या गोष्टींमुळे लूकमध्ये बदल होतो आणि व्यक्तिमत्व आधिक आकर्षक होते. आजकाल हेअर कलरिंगची फार मोठी क्रेझ महिलांमध्ये दिसून येतेय.

हेअर कलर केल्यामुळे, केसांचा एकूणच लूक बदलतो. त्यामुळे, महिलांचा सर्वाधिक कल हा हेअर कलरिंगकडे आहे. कलर केलेल्या केसांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली तर केस छान मेंटेन राहतात. रंगीत केसांवर कोणतेही उत्पादन किंवा घरगुती उपाय लागू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

Hair Care Tips
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

खरे तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या रंगीत केसांवर थेट वापरल्या तर याचा केसांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे, केसांचे नुकसान तर होतेच शिवाय, केसांचा रंग फिका पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही रंगीत केसांवर करणे टाळायला हवे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

लिंबाचा रस

केस चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून केसांना लिंबाचा रस लावला जातो. परंतु, लिंबामध्ये व्हिटॅमीन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे, आम्लयुक्त असलेला हा लिंबाचा रस कलर केलेल्या केसांना लावल्यामुळे केसांचा रंग कालांतराने निघून जाऊ शकतो. शिवाय, केस कमजोर होऊ शकतात.

मेहंदी

मेहंदी ही केसांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. परंतु, कलर केलेल्या केसांवर मेहंदीचा वापर करणे चुकीचे आहे. कारण, याचा विपरित परिणाम केसांवर होण्याची शक्यता असते. कारण, कलर केलेल्या केसांवर मेहंदी लावल्यामुळे केसांचा रंग बदलू शकतो. तसेच, केस खराब देखील होऊ शकतात.

बेकिंग सोडा

जर तुम्ही केसांना सुंदर कलर लावला असेल तर तुमच्या रंगीत केसांवर बेकिंग सोड्याचा वापर करणे टाळा. बेकिंग सोड्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे, रंगीत केसांना हानी पोहचू शकते. बेकिंग सोडा रंगीत केसांवर थेट लावल्यास केसांमधील नैसर्गिक तेल आणि रंग निघून जाऊ शकतो. त्यामुळे, तुमचे केस अधिक कोरडे आणि कमकुवत दिसू शकतात.

Hair Care Tips
Hair Care Tips : महागडे केमिकलयुक्त हेअर कलर सोडा; केसांना लाल रंग येण्यासाठी मेहंदीमध्ये मिक्स करा 'या' घरगुती गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com