लाइफस्टाइल

Tulsi Benefits : केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीची पानं, असा करा वापर

केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीची पानं

Aishwarya Musale

तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते. फार पूर्वीपासून तुळशीचा अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापर करण्यात आला आहे. तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे देखील मिळतात. विशेष म्हणजे केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळस अत्यंत फायदेशीर ठरते.

केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. केसांंमधील कोंडा, केस कोरडे आणि निस्तेज होणे, केसांना फाटे फुटणे अशी त्यामागची अनेक कारणे असू शकतात. यासाठी केसांचे योग्य पोषण होणे फार गरजेचे असते.

जर आपण केसांसाठी तुळशीच्या फायद्यांबद्दल बोललो तर केसांच्या वाढीपासून ते कोंड्याच्या समस्येपर्यंत सर्व काही तुळशीच्या वापराने बरे होऊ शकते. तुळशीचे हेअर पॅक आणि तुळशी शॅम्पूचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही घरातल्या वस्तू वापरून ही उत्पादने घरी तयार करू शकता आणि हे सर्व उपाय केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. ,

केसांसाठी तुळशीचे फायदे

जर तुम्हाला केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर तुळस वापरून ही समस्या दूर होईल. तुळशीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

तुमच्या टाळूवर संसर्ग झाल्यास तुळशीची पेस्ट लावावी. यामुळे संसर्गाचा प्रभाव कमी होतो.

तुमच्या केसांच्या वाढीसाठीही तुळस फायदेशीर आहे. तुळशीच्या पाण्याने केस धुवू शकता.

जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर नारळाच्या तेलात तुळशीची पेस्ट मिसळा आणि केसांना लावा, यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल.

तुळशीच्या पाण्याने केस धुवा

पाण्यात मूठभर तुळस टाका, उकळवा आणि नंतर हे पाणी थंड करा. या पाण्याने केस धुवा. तुम्ही हे आठवड्यातून एकदा करू शकता.

तुळस आणि कडुलिंब हेअर मास्क

तुळस आणि कडुलिंब बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर ही पेस्ट टाळूवर लावा. हा मास्क केसांवर ३० मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे करा. केसांची हरवलेली चमक परत येईल.

मसाज करा

केस खूप कोरडे होत असतील तर खोबरेल तेलात तुळशीची पाने टाकून तेल थोडे गरम करून टाळूची मालिश करा. केसांना किमान 10 मिनिटे मसाज केल्यानंतर केसांना हॉट टॉवल ट्रीटमेंट द्या. यामुळे तुमच्या केसांमधील कोरडेपणा दूर होईल.

शॅम्पूमध्ये तुळशीचा रस मिसळा

शॅम्पूमध्ये तुळशीचा रस मिसळा आणि केस धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या कमी होईल आणि केसांमध्ये उवा असतील तर त्या मरतात.

लिंबू आणि तुळशीचा रस

जर तुम्हाला जास्त कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही लिंबाच्या रसात तुळशीचा रस मिसळून टाळूला लावा आणि काही वेळ राहू द्या. यानंतर तुम्ही तुमचे केस पाण्याने धुवू शकता.

गुलाब पाण्यात तुळशीचा रस मिसळा

गुलाब पाण्यात तुळशीचा रस मिसळा आणि नंतर हे मिश्रण केस आणि टाळूला लावा. असे केल्याने केसांचा कोरडेपणा दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT