Hair Mask : कोंड्यामुळे त्रस्त आहात? 'या' आयुर्वेदिक मास्कमुळे केसांच्या समस्या होतील दूर

'या' आयुर्वेदिक मास्कमुळे केसांच्या समस्या होतील दूर
Hair Mask : कोंड्यामुळे त्रस्त आहात? 'या' आयुर्वेदिक मास्कमुळे केसांच्या समस्या होतील दूर

लांबसडक, मऊ, चमकदार केसांसाठी तुम्ही बऱ्याचदा महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करता. मात्र या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या अधिक वाढू शकतात. केस गळणे, कोंडा होणे ही सामान्य समस्या आहे. मात्र केसांतील कोंडा ही समस्या छोटी असली तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. केसातील कोंडा दूर व्हावा म्हणून काही जणं बरेच पैसे खर्च करतात.

कोंडा दूर करण्यासाठी हा आयुर्वेदिक हेअर मास्क प्रभावी आहे. हे तुमच्या हेअर फॉलिकल्सला मजबूत करते आणि कोंडा दूर करून केस गळणे देखील कमी करते. हा मास्क बनवण्याची आणि लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

हेअर मास्क

दह्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. दह्यामध्ये असलेले पोषक तत्व केसांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

त्रिफळा आणि कडुलिंबात अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डोक्यातील कोंडा आणि स्कॅल्पची खाज कमी होते.

केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी भृंगराज ही औषधी वनस्पती उपयुक्त आहे.

आल्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. तसेच ते कोंडामुळे होणारे केस गळणे कमी करते.

त्रिफळा, कडुनिंब, भृंगराज आणि आले एकत्र करून तयार केलेला हा मास्क केसातील कोंडा आणि खाज दूर करतो.

हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि स्प्लिट एंड्स देखील कमी करते.

Hair Mask : कोंड्यामुळे त्रस्त आहात? 'या' आयुर्वेदिक मास्कमुळे केसांच्या समस्या होतील दूर
Superfood for Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश, रक्तातील साखरेची समस्या होईल दूर

आयुर्वेदिक हेअर मास्क कसा तयार करायचा?

साहित्य

दही - 1 टेबलस्पून

त्रिफळा - 1 टीस्पून

कडुलिंब पावडर - 1 टीस्पून

भृंगराज- 1 टीस्पून

आले - 1 टीस्पून

बनवण्याची पद्धत

  • सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा.

  • अर्धा तास बाजूला ठेवा.

  • आता ते केसांना लावा.

  • ते केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचू द्या.

  • साधारण अर्धा तास केसांमध्ये तसंच राहू द्या.

  • आता केस चांगले धुवा.

  • तुम्हाला ते आठवड्यातून दोनदा सलग 3 आठवडे लावावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com