लाइफस्टाइल

Health Care News : चयापचय वाढवण्यासाठी आहारात या पेयांचा समावेश करा!

असे काही ड्रिंक्स आहेत जे आपलं चयापचय वाढवू शकतात

Aishwarya Musale

जेव्हा मेटाबॉलिजम बूस्ट करण्याचा विचार येतो तेव्हा लिंबू पाण्याचे सेवन आपल्यासाठी नक्कीच चांगले होईल. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. इतकंच नाही तर त्यामुळे अन्नातून मिळणारे पोषक तत्वही चांगल्या पद्धतीने शोषले जातात. जेव्हा शरीराला चांगले पोषक तत्व मिळतात तेव्हा ते चयापचय वाढवते.

ग्रीन टी

लिंबू पाण्याव्यतिरिक्त, ग्रीन टीचे सेवन करणे देखील चयापचयसाठी चांगले मानले जाते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे तुमची पचनशक्ती सुधारतात. याशिवाय, हे शरीरातील चयापचय दर देखील सुधारते. तुम्ही दिवसभरात किमान एक कप ग्रीन टी पिणे आवश्यक आहे.

अ‍ॅपल व्हिनेगर

अ‍ॅपल व्हिनेगर केवळ चयापचय वाढवण्यास मदत करत नाही तर ज्यांना मधुमेह किंवा पीसीओडीची समस्या आहे त्यांच्यासाठी देखील ते खूप फायदेशीर आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे वजन नियंत्रणातही खूप मदत होते.

मात्र, ते घेताना लक्षात ठेवा की एक ग्लास गरम पाण्यात एक चमचाच घ्या.ज्या लोकांना अ‍ॅसिडिक ब्लोटिंग, डोकेदुखी किंवा दातांच्या समस्या आहेत त्यांनी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेऊ नये.

आल्याचा चहा

थंडीच्या दिवसात चयापचय वाढवण्यासाठी आल्याचा चहा घेऊ शकता. आल्याचा थर्मोजेनिक प्रभाव असतो, ज्यामुळे ते शरीरातील तापमान वाढवते. त्यामुळे तुमची चयापचय प्रक्रिया सहजतेने वाढते. तुम्ही कोमट पाण्यात काढा तयार करून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT