Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ही योगासने करा!

या योगासनांमुळे अ‍ॅसिडिटीच्या समस्यांपासून मिळेल आराम
Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ही  योगासने करा!

आजकाल अॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येने प्रत्येकजण हैराण झाला आहे. अनेकदा चुकीचे अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, परंतु जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी हे आसन करून पहा

अर्ध मत्स्येंद्रासनाचे फायदे

अर्धा मत्स्येंद्रासनाला हाफ स्पाइनल पोज असेही म्हणतात. हे सिटिंग स्पाइनल ट्विस्ट आहे जे पचन आणि मुद्रा सुधारण्यास मदत करते. हे आसन सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर चार तासांनी करावे. या आसन केल्यावर पोटावर दाब येतो, त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. पचनसंस्थेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.

Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ही  योगासने करा!
Pneumonia In Winter : थंडीत मुलांना असतो न्यूमोनियाचा धोका, अशी घ्या काळजी

अर्ध मत्स्येंद्रासन कसे करावे

  • शांत ठिकाणी बसा आणि जमिनीवर पाय सरळ ठेवून बसा.

  • आता कंबर आणि पाठीचा कणा सरळ करा.

  • डावा पाय वाकवून उजव्या गुडघ्यावर आणा आणि डावा पाय जमिनीवर ठेवा.

  • उजवा पाय वाकवा आणि पाय डाव्या नितंबाजवळ आरामात जमिनीवर ठेवा.

  • उजवा हात डाव्या पायावर आणा आणि डाव्या पायाचे बोट धरा.

  • श्वास सोडताना, धड शक्य तितके वाकवा आणि मान वाकवा जेणेकरून डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित होईल.

  • डावा हात जमिनीवर ठेवा आणि सामान्यपणे श्वास घ्या. ही अर्ध मत्स्येंद्रासनाची मुद्रा आहे. खालील चित्र पहा.

  • 30-60 सेकंद पोझमध्ये रहा.

  • आसनातून बाहेर पडण्यासाठी सर्व पायऱ्या उलट क्रमाने करा.

  • या सर्व चरणांची दुसऱ्या बाजूनेही पुनरावृत्ती करा.

बालासना

बालासन ही एक विश्रांतीची मुद्रा आहे. हे योगासन आपल्या पचनसंस्थेला आराम देते आणि अ‍ॅसिडिटीपासून मुक्त होण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा ते तुमच्या पोटातील अवयवांना योग्य प्रकारे ताण देऊन त्यांना मजबूत बनवण्यास मदत करते. बालासन ताण आणि थकवा कमी करून नितंब, मांड्या आणि घोट्याला चांगल्या प्रकारे ताण देते.

बालासन कसे करावे

  • वज्रासनात बसून पाठीचा कणा सरळ ठेवा.

  • श्वास घ्या आणि दोन्ही हात वर करा

  • श्वास सोडताना हात सरळ ठेवून कंबर पुढे वाकवा.

  • इतके वाकवा की तुमचे कपाळ जमिनीला स्पर्श करेल.

  • हातही जमिनीला स्पर्श करतील, आता ३० सेकंद असेच राहा.

  • नंतर वज्रासनात परत या आणि रिलॅक्स करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com