Gardening Tips
Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : घरातील 'या' टाकाऊ वस्तूंच्या मदतीने सजवा तुमचे टेरेस गार्डन

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : घरासमोरच्या अंगणात विविध प्रकारची झाडे लावण्यासोबतच, आजकाल गॅलरी आणि टेरेसवर देखील बाग-बगीचा फुलवला जात आहे. त्यामुळे, लोक आता गॅलरी आणि टेरेस सजवण्यावर ही भर देत आहेत. यामुळे, तुमच्या घराचा लूकच पूर्णपणे बदलून जात आहे.

टेरेसवरील गार्डन सजवणे हे वाटते तितके फार काही अवघड काम नाही. यासाठी तुम्ही घरातीलच काही पडून राहिलेल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करू शकता. या वस्तूंच्या मदतीने तुम्ही तुमचे टेरेस गार्डन सुंदररित्या सजवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वस्तू?

शोभेच्या वस्तू ठेवा

खर तर आपल्या घरात कितीतरी शोभेच्या वस्तू आणून ठेवलेल्या असतात. यातील काही वस्तूंचा आपण वापर करतो तर काही शोभेच्या वस्तू तशाच पडून राहतात. यातीलच काही घरात पडून राहिलेल्या शोभेच्या वस्तूंचा वापर तुम्ही टेरेस गार्डन सजवण्यासाठी करू शकता. यामुळे, तुमच्या टेरेस गार्डनला आणखी शोभा येईल. यात काही शंका नाही.

दिवाळीतील लाईटिंगच्या माळा

दिवाळीमध्ये आपण घर सजवण्यासाठी लाईटिंगच्या माळांचा वापर करतो. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि विविध आकारांतील लाईटिंगच्या माळा लावून आपण आपले घर सजवतो. मात्र, दिवाळी झाल्यानंतर या माळा काढून ठेवल्या जातात. यातील काही लाईटिंगच्या माळा घरातच नंतर पडून राहतात. या माळांचा वापर करून तुम्ही तुमचे टेरेस गार्डन उत्तम प्रकारे सजवू शकता. या लाईटिंगच्या माळांचा वापर केल्याने तुमचे झाडांनी बहरलेले टेरेस आणखी सुंदर दिसेल.

टेरेस गार्डनवर लावा झोपाळा

अनेक जण झोपाळा घरातच लावतात. मात्र, तुम्ही टेरेस गार्डनवर ही झोपाळा लावू शकता. या मुळे तुमच्या टेरेस गार्डनला छान लूक येईल आणि झाडांच्या सानिध्यात झोपाळ्यात बसायला तुम्हाला ही छान वाटेल. या झोपाळ्यावर काही कृत्रिम पद्धतीच्या झाडांच्या वेली अडकवून तुम्ही झोपाळ्याला सुंदर लूक देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT