Trendy hair colour 
लाइफस्टाइल

फॅशन-टॅशन  :  ट्रेन्डी हेअरकलर 

माधुरी सरवणकर-तेलवणे

आपल्या लुकमध्ये नवनवीन प्रयोग करायला प्रत्येकाला आवडते. लुक बदलायचा ठरल्यावर त्याचा प्रारंभ केसांपासून होतो. आकर्षक हेअर कटसोबत त्यावर कोणता कलर सुंदर दिसेल याच विचारांमध्ये आणि शोधामध्ये तासनतास वाया जातात. सध्या हेअर कलरमध्ये लेटेस्ट ट्रेन्ड आलेले पाहायला मिळतात. अगदी मोरपंखी, निळा, पिवळा रंगही मुलींच्या पसंतीस उतरत आहे. 

आजकाल हेअरकलर म्हणजे पांढरे केस काळे करणे इतकेच नव्हे, तर फॅशनचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हेअर कलरने फक्त तुमच्या केसांना वेगळा रंग मिळतो असे नाही, तर पूर्ण चेहऱ्याचा लुकच चेंज होतो. दरवर्षी केसांसाठी वेगळा ट्रेन्ड येतो. सर्वाधिक तरुणांना आवडणारा प्रकार म्हणजे हायलाइट. पूर्वी बरगंडी, ब्लॉंड, चॉकलेट, गोल्ड आदी रंग फार फेमस होते. अजूनही त्यांची क्रेझ कायम आहे. मात्र, आता पिवळा, निळा, हिरवा, मोरपंखी, केशरी अगदी करडा रंगदेखील मुली ट्राय करीत आहेत. ‘जमाना बदल गया है’ या उक्तीप्रमाणे चौकटीच्या पलिकडे जाऊन विचार केला जात असून काही तरी हटके करण्यासाठी हे सर्व प्रयोग केले जाताहेत. 

फॅशन  : सेलिब्रिटींची स्टाईल स्लिप ड्रेस

खरंतर या रंगांमधील चंक्‍स खूप भन्नाट दिसतात. मल्टी शेड्‌समध्ये हायलाइटचा पर्याय देखील जबरदस्त आहे. कॉलेज स्टुडंटसाठी मल्टी शेड्‌समधील हायलाइट तर ए-वन आहे. तुम्ही नोकरदार किंवा गृहिणी असाल, तर तुम्हाला आवडणारा रंग सिलेक्‍ट करून फक्त दोन बटांना तो दिल्यास तुम्हीही कुल दिसाल. फॅशन डिझाइनर लॉरेन बॉकर यांच्या नव्वदच्या दशकात आलेल्या ‘द क्राफ्ट’ या चित्रपटातून हेअरकलर तयार करण्याची कल्पना सुचल्याचे म्हटले आहे. सध्या ब्युटी पार्लर बंद आहेत, मात्र कोरोनाने आपली पाठ सोडल्यावर तुम्ही हे रंगीबेरंगी हेअर कलर नक्की ट्राय करून पाहा. 

अशी घ्या काळजी 
१. तुम्ही घरच्या घरी कलर करणार असाल, तर केसांच्या मुळापासून तो लावायला सुरुवात करू नये. 
२. केसांच्या सुरक्षिततेसाठी कलर शाम्पू, कंडिशनरचा वापर करावा. 
३. चेहऱ्याच्या ठेवणीनुसार रंग निवडावा. 
४. उन्हात फिरताना स्कार्फ किंवा कॅप घालावी. कारण उन्हाने केसांचा रंग फेंट होतो. तसेच, गरम पाण्याने केस धुवू नये. 
५. केस तुटण्यापासून वाचविण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT