फॅशन + : सेलिब्रिटींची स्टाईल स्लिप ड्रेस

Celebrity-Night-Dress
Celebrity-Night-Dress

प्रत्येक व्यक्तीची फॅशनची व्याख्या वेगळी असते. पण, तरीही ट्रेडिंगच्या गोष्टी एकदा फॉलो कराव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. शिवाय सेलिब्रिटींची फॅशन आपणही करावी, ही प्रत्येक मुलीची विशलिस्ट असते. फॅशनमधील एक नवा पॅटर्न म्हणजे सेलिब्रिटी स्टईलचा स्लिप ड्रेस.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशी करायची फॅशन?
ड्रेस 

नावाप्रमाणेच हा ड्रेस स्लिप अर्थात स्लिवलेस आहे. पार्टीवेअरसाठी हा ड्रेस अगदी चांगला ऑप्शन आहे. या ड्रेसचे रंग सहसा भडक नसतात. त्यामुळे कोणत्याही ऑकेजनसाठी तुम्ही तो घालू शकता. या ड्रेसचा पॅर्टन शॉर्ट नसतो. या ड्रेसला घालण्याचे अनेक प्रकार आहेत. अनेकजण या ड्रेसवर डेनिस जॅकेट किंवा कोट घालणे पसंत करतात. या ड्रेसच्या आतमध्ये तुम्ही हातांचे इनर घालूनही फॅशन करु शकता. एकूणच हा ड्रेस आपण पार्टीवेअर, आउटिंग, पिकनिक, कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घालू शकतो.

ॲक्सेसरीज 
सिल्कचे कापड असल्याने हा ड्रेस असाही उठून दिसतो. पण, तुम्ही कोणत्या ठिकाणी हा ड्रेस घालत आहात त्याप्रमाणे ॲक्सेसरीज घालू शकता. या ड्रेसचा गळा मोठा असल्याने पार्टीला जाताना नाजूक आणि बारीक गळ्यातले घालता येईल. दिवसा तुम्ही कुठे फिरायला जात असाल, इनरसह हा ड्रेस घालणार असाल, तर कमरेला स्टाइलिश बेल्ट लावू शकता. स्लिंग बॅगसह तुमचा संपूर्ण लुक सुंदर दिसेल.

चप्पल
आधी सांगितल्याप्रमाणे हा ड्रेस पार्टीवेअर आहे, तसा कॅज्युअलही आहे. त्यामुळे क्लिअर हिल्स, हिल्स, बूट्स यावर शोभून दिसतील. फिरायला जाताना इनरसोबत घालणार असाल तर, पांढरे स्निकर्स किंवा शूज घालू शकता.

1) हे कापड हे सहसा सिल्कचे, हलके आणि सळसळीत असते. कोणत्याही बॉडी टाइपसाठी हा ड्रेस योग्य

2) हा ड्रेस गुडघ्यापर्यंत असतो. त्यामुळे शॉर्ट हाइटची चिंता नाही.

3) समर आणि विंटर या सिझनसाठी हा ड्रेस तुम्ही नक्की परिधान करु शकता.

4) स्टायलिश असल्याने ॲक्सेसरीजची आवश्यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com