Neeraj Chopra esakal
लाइफस्टाइल

ऑलिम्पियन नीरज चोप्राची Style भाल्यापेक्षा महागडी

बाळकृष्ण मधाळे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आता भारतीय खेळाचा नवा 'पोस्टर बॉय' बनलाय. '

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Javelin Thrower Neeraj Chopra) आता भारतीय खेळाचा नवा 'पोस्टर बॉय' बनलाय. 'क्रिकेट बॅट' खरेदी करण्याची स्पर्धा येथे सर्वाधिक असताना नीरजनं देशात 'भालाफेक' लोकप्रिय केला. नीरज त्याच्या कर्तृत्वाव्यतिरिक्त 'फॅशनेबल दुनियेत'ही तो फेमस होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी, नीरजनं Nike Air Jordan 1 स्नीकर परिधान केल्याचं पहायला मिळालं होतं आणि हेच स्नीकर दीपिका पादुकोणनं वर्षाच्या सुरुवातीला घातलं होतं.

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर, नीरज चोप्रानं इंडिया टुडे स्पाइस मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी पहिलं फोटोशूट केलंय. नीरजनं या फोटोशूटसाठी घातलेला स्वेटशर्ट (sweatshirt) 'फॅशनेबल दुनियेत' खूप चर्चेचा विषय बनलाय. हा स्वेटशर्ट एडवर्ड लालरेम्पिया (Edward Lalrempuia) यांनी डिझाइन केलाय.

Neeraj Chopra Style

या जांभळ्या-काळ्या स्वेटशर्टमध्ये नीरज चोप्रा एकदम आकर्षक दिसतोय. त्यानं काळ्या पँटवर हा स्वेटशर्ट परिधान केलाय. नीरजनं घातलेला हा स्वेटशर्ट मोनोग्राम जॅकवर्ड स्वेटशर्ट Louis Vuitton या ब्रँडचा आहे. LV पींक मद्रास थीमनं हा स्वेटशर्ट पुन्हा ऑनलाइनवर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिलाय. या स्वेटशर्टची किंमत जाणून घेतल्यावर तुम्हालाही थोडा धक्का बसेल.

Neeraj Chopra Style

या स्वेटशर्टची किंमत सुमारे 1,09,969 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या स्वेटशर्टची किंमत नीरज चोप्राच्या भालाच्या किंमतीच्या जवळपासच आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ह्या स्वेटशर्टमध्ये 93 टक्के कापूस आणि 7 टक्के पॉलिस्टर वापरला असून हा शर्ट इटलीत बनवण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT