ऑलिम्पियन नीरज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; चोप्राला भावली 'ही' गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अनोख्या फॅशनसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

ऑलिम्पियन नीरज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; चोप्राला भावली 'ही' गोष्ट

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या अनोख्या फॅशनसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दीपिकाचं 'स्नीकर' प्रेम देखील कोणापासून लपलेलं नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच दीपिका Nike Air Jordan 1 स्नीकर परिधान करताना दिसली. आता याच स्नीकरच्या प्रेमात ऑलिम्पियीन देखील पडलाय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) पायात आता हेच 'स्नीकर' दिसताहेत.

मित्रांसोबत डिनर डेटला जाताना दीपिकानं Nike Air Jordan 1 स्नीकर घातला होता. यावर तिनं लूज जॉगर्स ब्लॅक कॅज्युअल आउटफिट घातलं होतं. तर दुसरीकडे नीरज चोप्रा देखील कर्नाटकातील एका क्रीडा संस्थेत गेला असता, त्यानं सुध्दा स्नीकर परिधान केलेलं पहायला मिळालं. नीरजनं स्वेटशर्ट आणि कार्गो पॅंटसह स्नीकर परिधान केलं होतं.

शूजची किंमत किती?

Nike Air Jordan 1 sneakers ची किंमत आधी 13,995 रुपयाला होती. आता या स्नीकरला ऑनलाइन बाजारात मोठी मागणी वाढल्याने लवकरच नवीन किंमतीच्या टॅगसह हे शूज बाजारात उपलब्ध होतील. एका अहवालानुसार, लोकांना देखील हे स्नीकर खूप आवडले असून बाजारात आता स्नीकरची किंमत 75,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्राही आपल्या फॅशन सेन्समुळे आजकाल चर्चेत आहे. त्याच्या अॅथलीट लूकपासून ते त्याच्या हेअरस्टाईलपर्यंत चाहत्यांना त्याच्याकडून भरभरून प्रेम मिळतंय. नीरजनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, की ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापूर्वीचं त्यानं आपले लांब केस कापले होते.

टॅग्स :deepika padukone