Oily Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Oily Skin Care : चेहरा तेलाची खाण बनला असेल तर उन्हाळ्यात या चूका टाळाच; तेलकट त्वचेसाठी करा हे उपाय

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता

सकाळ डिजिटल टीम

Oily Skin Care :

उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. या ऋतूमध्ये त्वचेतून जास्त घाम आणि तेल बाहेर पडू लागते, त्यामुळे चेहरा चिकट दिसू लागतो. तेलकट त्वचेमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे त्वचेवर घाण आणि बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. इतकेच नाही तर तेलकट त्वचेमुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्याही उद्भवू लागतात.

उन्हाळ्यात काही चूका आपल्याकडून घडल्या तर ही तेलकट त्वचेची समस्या अधिक वाढते. त्या कोणत्या चूका आहेत, आणि तेलकट त्वचा कशी नॉर्मल बनवायची यासाठीचे काही घरगुती उपाय आपण पाहणार आहेत.

सतत चेहरा धुवू नका

उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने काही लोक वारंवार चेहरा धुतात. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा वाढतो. त्यामुळे तेलाचे उत्पादन वाढते. त्यामुळे दिवसातून दोनदाच चेहरा स्वच्छ करा.

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी मॉइश्चरायझर लावायला विसरू नये. कारण, उन्हाळ्यात मॉइश्चरायझर न लावल्याने त्वचेच्या समस्यांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उन्हाळ्यात मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तुम्ही लाइट किंवा जेल मॉइश्चरायझर वापरू शकता.

सतत स्क्रब करू नका

जर तुम्ही सतत स्क्रब करत असाल तर ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. तुम्हाला त्वचेची जळजळ देखील होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही रासायनिक एक्सफोलिएट वापरू शकता. यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त वेळा त्वचेला स्क्रब करू नका.

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी बहुतेक लोक महागडे फेस वॉश आणि सौंदर्य उत्पादने वापरतात. परंतु त्यामध्ये हानिकारक पदार्थ असतात. जे त्वचेला हानी पोहोचवू शकतात.  या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

गुलाब जल - तेलकट त्वचेसाठी गुलाब जलाचा वापर करा, कारण गुलाबजल त्वचेचा PH सुधारून चेहऱ्यावरील घाण साफ करायला मदत करते.

मुलतानी माती - चेहऱ्याच्या काळजीबद्दल कोणी सांगत असेल तर मुलतानी मातीचा उल्लेख होतोच. मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावरील तेल शोषून घेण्याचे काम करते. ज्यामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो.

 ओट्स - ओट्स त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ओट्स चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स आणि मुरुमांची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही ओट्सचा फेसमास्क वापरू शकता.

काकडी - काकडी त्वचेसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काकडीत सुखदायक आणि तुरट गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT