pension google
लाइफस्टाइल

अल्पभूधारक आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन

या योजनेचं नाव आहे पीएम किसान मानधन योजना होय. यासाठी तुमचे नाव पीएम किसान सम्मान निधीमध्ये असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल आणि तुमचं वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुमचं नशीब फळफळलंच म्हणून समजा. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी एक योजना सुरू केली आहे ज्यात दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.

या योजनेचं नाव आहे पीएम किसान मानधन योजना होय. यासाठी तुमचे नाव पीएम किसान सम्मान निधीमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणूनच या योजनेचा तपशील पाहू या...

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वात आधी पीएम किसान सम्मान निधीमध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ५५ रुपये भरावे लागतील.

१८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व्यक्ती रोज २ रुपये वाचवून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ४० व्या वर्षी तुम्ही या योजनेत सहभागी होणार असाल तर २०० रुपये प्रतिमहिना भरावे लागतील. यासाठी बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये नोंदणी करावी. यासाठी एका विशेष पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व्हिस सेंटरद्वारे सर्व माहिती सरकारला पाठवली जाते.

नोंदणीसाठी आधार कार्ड, बचत खात्याचे किंवा जनधन खात्याचे पासबुक आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. तसेच बँक खात्यातून पैसे कापले जावेत यासाठी नोंदणी करताना आणि बँकेत संमतीपत्र द्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

SCROLL FOR NEXT