
दर महिन्याला २१० रुपये भरा आणि साठीनंतरची सोय करा
मुंबई : असंघटित कुटुंबांना आर्थिक लाभ देण्यासाठी २०१५ सालापासून PM Atal Pension Yojana चालवली जाते. याअंतर्गत १० हजार रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन मिळू शकते.
सुरुवातीला ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपुरती मर्यादित होती. आता १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. वयाची साठी उलटल्यानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होईल.
हेही वाचा: केंद्राच्या अटल पेन्शन योजनेत बदल, पेन्शनची रक्कम कमी जास्त करता येणार!
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ६० वर्षे पूर्ण होण्याच्या आधी झाल्यास त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळू शकते. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी एकरकमी लाभाचा दावा करू शकते. पत्नीचाही मृत्यू झाल्यास तिच्या वारसदाराला एकरकमी लाभाचा दावा करता येईल.
या योजनेंतर्गत १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवता येईल. बचत खाते, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असलेली प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
एखादी व्यक्ती १८व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल तर ६०व्या वर्षानंतर सर्वाधिक ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दर महिन्याला केवळ २१० रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना प्राप्तिकरामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतचा tax benefit मिळेल. काही वेळा ५० हजार रुपयांचा अतिरिक्त tax benefitही मिळू शकतो.
योजनेत सहभागी कसे व्हाल ?
तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज घेऊ शकता किंवा बँकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करू शकता. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज मिळवता येईल. हा अर्ज हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड़, मराठी, बंगाली, ओडिया, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Web Title: Atal Pension Yojana Gives Benefit Of Pension After Sixty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..