Relationship Tips : esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : हा रुसवा सोड सखे; रूसलेल्या पत्नीला असं मनवा, ती पटकन होईल खुश

Husband Wife Relationship Tips :संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. पण पती-पत्नीत झालेली भांडण कधी कधी भांड्यांच्याही जीवावर येतात.

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips :

पती-पत्नीची भांडणं होणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. सध्या गोडी गुलाबीने संसार करणारे, न भांडता एकत्र राहणारे जोडपं दुर्मिळच म्हणावं लागेल. कारण किरकोळ वादावरूनही मोठे भांडण होऊ शकत. काही जोडप्यांची भांडण अशी असतात, की जी रात्री भांडतात आणि सकाळी एकत्र येतात. त्यामुळे अशा लूटपुटच्या भांडणांमुळे संसारात गोडी अधिकच वाढते.

संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. पण पती-पत्नीत झालेली भांडण कधी कधी भांड्यांच्याही जीवावर येतात. कारण रुसलेली पत्नी उगीचच भांड्यांवर राग काढायला लागते. त्यामुळे रुसलेल्या पत्नीला कसे मनवायचे, तिचा रुसवा कसा काढायचा, याच्या काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. (Husband Wife Relationship Tips)

एखादं भांडण झाल्यानंतर ते यासाठी मिटवले जात नाही की, मीच का सॉरी म्हणू, मी का पुढाकार घेऊ. काही नात्यात अनेक महिले नवरा बायको एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. पण असं करू नये, तुमची बायको रुसली असेल, किंवा तुमच्या जोडीदार उचला असेल तर त्याला मनवण्यासाठी या गोष्टी तुम्ही करायला हव्यात.

कारण माहिती करून घ्या

पत्नी नाराज असेल ती रुसली असेल तर सर्वात आधी त्यामागील कारण जाणून घ्या. ती जर तुमच्यामुळे ते तुमच्या एखाद्या कृतीमुळे रुसली असेल. तर, ती चूक सुधारण्याची संधी तिच्याकडून मागून घ्या. आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करा.

तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा

नवऱ्याची झालेले भांडण स्पष्टपणे सांगणाऱ्या बायका जगात आहे. पण काही महिला आजही अनेक गोष्टी मनात ठेवतात. आणि एकाच दिवशी त्याचा तांडव करतात. तर त्यामुळे तुम्ही काही चूक केल्याने पत्नी रूसली आहे असे जाणवले तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कारण बोलण्यामुळे आणि गोष्टी सोप्या होऊ शकतात.

तिला वेळ घेऊ द्या

भांडणामुळे पत्नी अबोला धरते आणि बोलायचं बंद करते. यावर नवरा तिला मनवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. पण असं करू नका ती रुसली आहे, तर तिला वेळ घेऊ द्या. जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा त्या आपोआप तुमच्याशी बोलायला येईल.

तिला आवडणाऱ्या गोष्टी भेट करा

पत्नीला जी गोष्ट आवडत असेल आणि तुम्ही ती तिला द्यायला टाळत असाल. तर, पत्नी चिडल्यावर ती गोष्टी नक्कीच बोलून दाखवेल. त्यामुळे तिने तुम्हाला टोमणे मारण्याऐवजी तिला आवडत असलेली गोष्ट तुम्ही नक्कीच तिला आणून द्या. त्यामुळे तिचा राग शांत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT