Relationship Tips: 'या' 5 सवयी नातं करतील घट्ट, जोडीदारही राहील आनंदी

Relationship Tips: जोडीदाराला आनंदी ठेवायचे असेल तर काही चांगल्या सवयी असल्या पाहिजे.
Relationship Tips:
Relationship Tips:Sakal

Relationship Tips these things improve your relationship with partner

नात्यातील कटूता कमी करणे प्रत्येकासाठी एक आव्हान असते. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही नात्यात तणाव निर्माण होऊ लागतो. जोडीदार एकमेकांबद्दल तक्रारी करू लागतात. नात्यात गैरसमज निर्माण झाल्यास नातं तुटू शकतं. अशा वेळी अनेकदा मनात प्रश्न पडतो की, आपला जोडीदार आनंदी राहावा आणि आपले नातंही घट्ट राहावे यासाठी काय करावे. तुमच्याही मनात असाच प्रश्न आला असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

वेळ देणे आवश्यक आहे

आजकालच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. दोघेही नोकरी करत असेल तर एकमेकांना वेळ देणे अशक्य होते. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. यामुळे नातं घट्ट होण्यासाठी आणि जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सुट्टीच्या दिवस सरप्राईज डिनर प्लॅन करावा किंवा घरीच दोघांनी मिळून रोमँटिक मुव्ही पाहावा.

मनमोकळे बोलावे

जोडीदाराला प्रत्येक गोष्टीसाठी गृहित धरू नका. तुमच्या मनात कोणत्या गोष्टीबाबत शंका असेल तर मनमोकळेपणाने बोलावे. यामुळे मन देखील हलके होते आणि कोणताही गैरसमज निर्माण होत नाही. जोडीदारावर तुमचे मत लादू नका. यामुळे नातं घट्ट होण्यास मदत मिळते.

Relationship Tips:
Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी

रागावर नियंत्रण ठेवावे

रागामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. कोणत्याही गोष्टीवर रागाने प्रतिक्रिया देऊ नका. एखादी गोष्ट चुकीची असेल तर जोडीदाराला शांतपणे बसूण समजुन सांगावे. यामुळे परस्पर आदराची भावना वाढते आणि नातं घट्ट होते.

विश्वास

कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वास हा नात्याचा पाया आहे. अनेक नातं तुटण्यात अविश्वास आणि शंका मोठी भूमिका बजावतात. एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यावर मनमोकळेपणाने चर्चा करून शंका दूर करावी. तुमच्या शंकांमुळे अविश्वास निर्माण होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे, तुमच्या जोडीदाराच्या मनात अशी कोणतीही शंका किंवा अविश्वास निर्माण होईल अशा गोष्टी करू नका.

कौतुक करावे

जोडीदाराची चुक झाल्यास आपण लगेच त्याला ओरडतो. पण एखादे चांगले काम केल्यास कौतुक करत नाही. असे करणे चुकीचे आहे. तुमच्या जोडीदाराचे मनमोकळेपणाने कौतुक करावे. यामुळे तुमच्याबद्दल जोडीदाराच्या मनात आदर वाढतो तसेच नातंही घट्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com