Face mask sakal
लाइफस्टाइल

Homemade Face mask: त्वचा ड्राय असो किंवा तेलकट, मूग डाळ तुमच्यासाठी फायदेशीर

प्रत्येक जण आपापल्या त्वचेच्या प्रकारानुसार विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतात.

Aishwarya Musale

प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या त्वचेच्या प्रकारानुसार विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतात. परंतु त्वचेची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे. यापैकी एक म्हणजे हिरवी मूग डाळ.

हिरवी मूग डाळ एक्सफोलिएंट म्हणून काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होते. इतकेच नाही तर यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे तुमच्या त्वचेची काळजी घेतात.

हिरवी मूग डाळ तुमच्या स्किन पोर्सला क्लॉग होण्यापासून रोखते. तसेच, त्याचे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म तुमची त्वचा चमकदार बनवतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही हिरवी मूग डाळ वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया -

मूग डाळ आणि टोमॅटोचा रस वापरा

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस मूग डाळीत मिसळून लावू शकता.

आवश्यक साहित्य-

  • हिरवी मूग डाळ - २ चमचे

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • टोमॅटो रस - 1 टीस्पून

  • दही - 1 टीस्पून

वापरण्याची पद्धत-

  • मास्क तयार करण्यासाठी, प्रथम हिरवी मूग डाळ सुमारे 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा.

  • आता जास्तीचे पाणी काढून टाका आणि त्याची पेस्ट बनवा.

  • आता त्यात टोमॅटोचा रस आणि दही घालून मिक्स करा. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यासोबतच देखील चमकवते.

  • ते चांगले मिसळल्यानंतर, आपला चेहरा स्वच्छ करा.

  • तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे राहू द्या.

  • शेवटी, चेहरा पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा.

हिरवी मूग डाळ आणि काकडीचा फेस पॅक

जर तुम्हाला तुमची तेलकट त्वचा तजेलदार बनवायची असेल तर तुम्ही मूग डाळीत काकडी मिसळून लावू शकता.

आवश्यक साहित्य

  • २ चमचे हिरवी मूग डाळ पावडर

  • 2 चमचे काकडीचा रस

वापरण्याची पद्धत-

  • सर्वप्रथम हिरवी मूग डाळ बारीक करून त्याची पावडर बनवा.

  • आता त्यात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवा.

  • तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि नंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

  • आपण सुमारे 15-20 मिनिटे असेच राहू द्या.

  • शेवटी, आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT