Monsoon Travel Tips sakal
लाइफस्टाइल

Monsoon Travel Tips: पावसाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी पहिल्या पॅक करा! ट्रिपचा आनंद होईल दुप्पट

सर्वांनाच पावसाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असते.

Aishwarya Musale

सर्वांनाच पावसाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असते. अनेकजण तर असे आहेत की ते वर्षभरात पावसाळ्यात फिरायला जायचं म्हणून सुट्टी घेत नाहीत. अनेक जण या ऋतूचा आनंद लुटण्यासाठी सहलीचे प्लॅनही करतात.

तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल आणि तुम्ही देखील या पावसाळ्यात सहलीचा विचार करत असाल. तर ट्रिपला जाण्यापूर्वी तुमची बॅग काळजीपूर्वक पॅक करणे फार महत्वाचे आहे. कारण पाऊस मजेशीर असतोच पण तो आरोग्यासाठीही वाईट ठरू शकतो.

छत्री

पावसाळ्यात तुम्हाला भिजायला आवडेल, पण तुम्ही जर पावसाच्या पाण्यात सतत भिजत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: ट्रॅव्हल करताना, स्वतःचे पावसाच्या पाण्यात भिजण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.

कारण तुमचे आरोग्य त्यामुळे बिघडू शकते. म्हणूनच पॅकिंग करताना पिशवीत छत्री नक्की ठेवा, जर तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करत असाल तर शक्य तितक्या छत्र्या ठेवाव्यात किंवा रेनकोट देखील ठेवू शकता.

प्लास्टिक मोबाइल कव्हर

प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि प्रवासात त्याचा सर्वाधिक वापर देखील होतो. पण तुम्ही जर पावसाळ्यात ट्रिपचे नियोजन करत असाल तर तुमच्या मोबाईलची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण पावसाळ्यात मोबाईल पाण्यात भिजला तर त्यामध्ये ओलावा येऊ शकतो किंवा तो खराब देखील होऊ शकतो.

म्हणूनच तुम्ही पॅकिंग करत असताना तुमच्या मोबाईलसाठी प्लास्टिकचे कव्हरही ठेवावे. प्रवासादरम्यान तुम्हाला जेव्हा पावसाचा सामना करावा लागतो तेव्हा तुमचा मोबाईल या कव्हरमध्ये झाकून ठेवा. महत्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल देखील सुरक्षित असेल आणि जेव्हा तुम्हाला सेल्फी घ्यायचे असेल तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता.

वॉटरप्रूफ शूज

चुकूनही पावसाळ्यात प्रवासादरम्यान हाय हिल्सचे किंवा कापडी शूज घालू नका. तुम्हाला यामुळे संपूर्ण वेळ अस्वस्थ वाटेल. प्रवास करताना पावसाळ्यात नेहमी वॉटरप्रूफ शूज घाला. हे शूज वरून भिजत असले तरी ते आतून कोरडे राहतील आणि तुम्हाला त्यामुळे चालताना कोणतीही अडचण येणार नाही.

अँटिबायोटिक्स

अनेक प्रकारचे या ऋतूमध्ये संसर्ग होतात. म्हणूनच तुमच्या ट्रॅव्हल पॅकमध्ये एक छोटा फर्स्ट एड बॉक्स देखील ठेवावा आणि तुम्हाला जर संपूर्ण बॉक्स ठेवायचा नसेल तर अँटिबायोटिक्स नक्की ठेवा. प्रवासादरम्यान, तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमच्या त्वचेमध्ये संसर्ग झाला आहे, तर तुम्ही ताबडतोब अँटिबायोटिक्सचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT