Oil Combinations For Hairs esakal
लाइफस्टाइल

Oil Combinations For Hairs : केसांच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतील ‘हे’ हेअर ऑईल कॉम्बिनेशन्स

तेलामुळे केसांना मजबूती मिळते आणि आवश्यक पोषकतत्वे ही मिळतात.

सकाळ डिजिटल टीम

केस कोरडे होणे आणि केसगळतीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. महिलांसोबतच आता पुरुषांमध्ये ही केसांच्या समस्या वाढल्या आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर केस कोरडे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.

हिवाळ्यामध्ये केसांची विशेष काळजी घेणे, महत्वाचे असते. या दिवसांमध्ये केसगळती आणि केस कोरडे होण्याची समस्या वाढते. त्यासाठी केसांना तेल लावणे गरजेचे आहे. तेलामुळे केसांना मजबूती मिळते आणि आवश्यक पोषकतत्वे ही मिळतात.

आज आम्ही तुम्हाला कॉम्बिनेशन ऑईल्सबद्दल सांगणार आहोत. कॉम्बिनेशन ऑईल्स अर्थात काही तेल आणि इतर घटक किंवा तेलांसोबतचे मिक्स कॉम्बिनेशन. जे केसांना अनेक समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात.

बदामाचे तेल आणि टी ट्री ऑईल

केसांसाठी आणि त्वचेसाठी बदामाचे तेल अतिशय फायदेशीर आहे. बदामाच्या तेलामुळे केसांना छान चमक येते. बदामामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळतो. या घटकांमुळे केस खराब होण्यापासून केसांचा बचाव होतो.

टीट्री ऑईल अर्थात चहाच्या झाडामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे, ही दोन्ही तेल एकत्र मिक्स करूनही केसांना लावू शकता. या दोन्ही तेलांच्या मिश्रणामुळे केसगळतीची आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकेल.

कढीपत्ता आणि नारळाचे तेल

कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कढीपत्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे केस गळतीचे प्रमाण आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

कढीपत्याची काही पाने उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर, नारळाचे तेल गरम करा आणि त्यात कढीपत्याची पाने घालून तेल चांगले उकळून घ्या. नंतर तेलाने केसांना मसाज करा.

कडुलिंब आणि बदामाचे तेल

कडुलिंब ही अतिशय औषधी वनस्पती आहे. कडुलिंबाचे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे होतात. परंतु, आरोग्यासोबतच कडुलिंब केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील तितकेच फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे, केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

बदामाच्या तेलामध्ये तर भरपूर प्रमाणात पोषकघटक आढळून येतात. त्यामुळे, बदाम तेल आणि कडुलिंब एकत्र आल्यावर केसांना छान पोषण मिळते.

कडुलिंबाच्या तेलाचे ५-६ थेंब हे बदामाच्या तेलात मिसळा आणि या तेलाने केसांना छान मसाज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT