Curry Leaves For Hair : केसांच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर कढीपत्ता आहे रामबाण उपाय!

Curry Leaves For Hair growth: हरवलेली केसांची चमक शोधायला कढीपत्ता करेल मदत, कसे ते वाचा
Curry Leaves For Hair growth
Curry Leaves For Hair growthesakal

Curry Leaves For Hair : वरणाच्या फोडणीत असलेला कढीपत्ता अलगद उचलून बाहेर ठेवला जातो. वरण, भाजी, मसाले अशा सगळ्याची चव वाढवणारा कढीपत्ता ताटात आल्यावर मात्र उचलून फेकला जातो.

असं असलं तरी तो त्यांचं काम करणं सोडत नाही. कढीपत्ता लसणाची फोडणी दिलेली कढी लोकांच्या गळ्यातील ताईत आहे.

कढीपत्त्याचे केवळ स्वयंपाकापुरता उपयोग नाही. तर त्याचा लेप, तेल केसांसाठी वरदान ठरत आहे. तुमचे केस अकाली राखाडी होत आहेत का? तुमचे केस वेगाने गळत आहेत आणि केसांची वाढ थांबली आहे का? अशा परिस्थितीत कढीपत्ता या समस्यांवर उपाय ठरू शकतो.

कढीपत्त्याची खास गोष्ट अशी आहे, की त्यात अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे काही समृद्ध पोषक असतात जे केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. याशिवाय त्यातील अनेक अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतात.

कढीपत्त्यामधील गुणधर्म

कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. ऍनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता तर असतेच, पण शरीरात रक्त योग्य प्रकारे शोषून घेण्याच्या असमर्थतेशीही त्याचा संबंध असतो. फॉलिक ऍसिड हा एक आवश्यक घटक आहे जो रक्ताला शोषण्यास मदत करतो.

 कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्वही असते.

त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो.

Curry Leaves For Hair growth
Hair Care Tips: कोणाचं तरी ऐकून 'हे' तेल कधीच केसांना लावू नका; फायदा नाही होईल नुकसानच

रिकाम्या पोटी 5 कढीपत्ता खा पण कशासाठी

राखाडी केसांसाठी कढीपत्ता खाणे तुम्ही काळ्या केसांसाठी कढीपत्ता खाऊ शकता. यासाठी 5 कढीपत्ता धुवून त्याचे सेवन करा. हे काम तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी करावे लागेल.

हे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी आणि सी वाढवते जे कोलेजन वाढवते आणि केस काळे होण्यास मदत करते (केस काळे करण्यासाठी कढीपत्ता). अशा प्रकारे काळ्या केसांसाठी कढीपत्ता अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

कढीपत्ता कापूरची पेस्ट

केसातील कोंड्यासाठी कढीपत्ता कापूर पेस्ट फायदेशीर ठरेल. कोंड्याच्या समस्येवर कढीपत्ता आणि कापूर दोन्ही घरगुती उपाय बनू शकतात.

त्यामुळे कोंडामुळे केसांना खाज येण्याचा त्रास होत असल्यास कढीपत्ता कापूरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावा. सुमारे 1 तास ते टाळूवर राहू द्या. आता केस थंड पाण्याने धुवा आणि शॅम्पू करा.

Curry Leaves For Hair growth
Hair Growth Tips: केस पांढरे होऊ लागलेत? आहारात करा या 9 सुपरफूडचा समावेश

कढीपत्त्याचे तेल

 केस गळतीसाठी कढीपत्त्याचे तेल तुम्ही केस गळतीसाठी कढीपत्त्यापासून तेल बनवू शकता आणि वापरू शकता. यासाठी मोहरीच्या तेलात कढीपत्ता शिजवून केसांना लावा.

थोडा वेळ मसाज करा. तुमच्या केसांच्या मुळांना पोषण देण्यासोबतच केसांची जलद वाढ होण्यास मदत होईल.

कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स तुमच्या केसांची वाढ जलद होण्यास मदत करतील. त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही केसांसाठी कढीपत्ता वापरू शकता.

कढीपत्ता नारळाचे तेल

कढीपत्ता आणि नारळाचे तेल या दोनच गोष्टी आवश्यक आहेत. सर्वप्रथम कढीपत्त्याची सहा ते सात पाने वाटून घ्या. एका पॅनमध्ये नारळाचे तेल घ्या.

त्यामध्ये वाटलेली कढीपत्त्याची पाने मिक्स करा आणि सात ते दहा मिनिटे तेल गरम करा.  हे तेल पांढऱ्या केसांसाठी गुणकारी ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com