Skin Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी संत्र्याची घ्या मदत, बनवा 'हे' फेसपॅक

कोरड्या त्वचेपासून सुटका करण्यासाठी तुम्ही संत्र्याची मदत घेऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : हिवाळ्यामध्ये अनेक हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारची फळे मार्केटमध्ये येतात. या फळांमध्ये ‘व्हिटॅमीन सी’ ने युक्त असलेले संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. संत्र्याची साल वाळवून त्याच्यापासून अनेक प्रकारचे फेसपॅक्स देखील बनवले जातात.

कडाक्याच्या थंडीला नुकतीच सुरूवात झाली आहे. या थंडीचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर ही परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी पडते. या कोरड्या त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅक्सची माहिती देणार आहोत. चला तर मग कोरड्या त्वचेची समस्या दूर करणारे संत्र्याच्या सालीचे फेसपॅक्स जाणून घेऊयात.

संत्र्याची साल आणि दूध

संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मॉईश्चराईझ करायला मदत करतात. त्यामुळे, त्वचेतील कोरडेपणा किंवा रूक्षपणा निघून जाण्यास मदत होते.

संत्र्याच्या सालीचा आणि दूधाचा फेसपॅक कसा करायचा ?

हा फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याची साल वाळवा. ही साल वाळवून त्यापासून पावडर तयार करा. आता या पावडरमध्ये दूध मिसळा आणि त्याची घट्ट पेस्ट तयार करा. तुमचा फेसपॅक तयार आहे.

आता हा फेसपॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या फेसपॅकचा चेहऱ्यावर वापर करा, कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

संत्र्याची साल आणि दही

आपल्या त्वचेवर ब्लॅकहेड्स येण्यामागचे कारण म्हणजे त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी होय. त्यामुळे, त्वचेची चमक देखील कमी होते आणि ब्लॅकहेड्सचे प्रमाण देखील वाढते. त्यामुळे, त्वचेवरील या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीची आणि दह्याची मदत घेऊ शकता.

संत्र्याची साल आणि दही यांचा फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याची साल वाळवा, त्याची पावडर करा. आता ३ चमचे संत्र्याची पावडर घ्या, त्यामध्ये २ चमचे दही मिसळा  आता तुमचा फेसपॅक तयार आहे. या फेसपॅकने चेहऱ्यावर १५-२० मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर, चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT