Vastu Tips:
Vastu Tips: Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: बाल्कनीत झाडे ठेवताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

पुजा बोनकिले

आजकाल प्रत्येकजण आपले घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडे लावतात. झाडांमुळे तुमच्या घरातील हवा सुधारतात आणि तुमचा मूडही सुधारतात. साधारणपणे आपल्या घराच्या जागेनुसार झाडे ठेवायला आपण सगळ्यांनाच आवडते. अनेक लोका बाल्कनीत झाडे लावतात. पण वास्तुचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. यामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा साकारत्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो

  • बाल्कनी दक्षिण दिशेला असल्यास काय करावे

घरातील बाल्कनी दक्षिण दिशेला असेल तर मोठी आणि जड झाडे ठेऊ शकता. ब्लॅक फिकस किंवा पामचे झाड ठेऊ शकता. याशिवाय, तुम्ही येथे मधुमालती किंवा बोगनवेल यासारख्या वेलींचे झाड लावू शकता. यामुळे बाल्कनी छान दिसेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल.

  • बाल्कनी उत्तर दिशेला असल्यास काय करावे

जर बाल्कनी उत्तर दिशेला असेल तर तिथे कधीही मोठी झाडे ठेऊ नका. या दिशेच्या बाल्कनीसाठी लहान झाडे सर्वोत्तम मानली जातात. येथे मनी प्लांट ठेवणे चांगले मानले जाते. याशिवाय तुम्ही येथे क्रॅसुला प्लांट देखील ठेऊ शकता.

  • हे झाडे ठेऊ नका

जेव्हा तुम्ही बाल्कनीमध्ये झाडे लावता तेव्हा काही झाडे लावणे अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ, तुमची बाल्कनी कुठल्या दिशेला असली तरीही तुम्ही बाल्कनीमध्ये कॅक्टस किंवा रबराचे झाड लावू नका. ज्या झाडांमधून दूध येते असे झाडे बाल्कनीसाठी चांगली मानली जात नाहीत. याशिवाय बाल्कनीतील एखादे रोप सुकले तर लगेच तेथून काढून टाका.

  • बाल्कनी पश्चिम दिशेला असल्यास कोणते झाड लावावे?

जर तुमची बाल्कनी पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही येथे मध्यम आकाराची हिरवी झाडे लावू शकता. या रोपांची उंची 2 फूट ते 4 फूट दरम्यान असावी. या दिशेला लहान रोपे ठेवणे फायदेशीर नसते. जर तुम्ही येथे काही मोठी झाडे ठेवली तर त्यामुळे तुमचा शनि मजबूत होतो. हे तुम्हाला पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग मोकळे करेल.

  • बाल्कनी पूर्व दिशेला असल्यास कोणते झाड लावावे?

जर घरातील बाल्कनी पूर्व दिशेला असेल तर तिथे तुळशीचे रोप नक्की ठेवावे. याशिवाय झेंडूच्या फुलांच्या रोपासारखी काही फुलांची झाडे ठेऊ शकता. विशेषत: झेंडूचे रोप ईशान्य दिशेला ठेवल्याने मुलांच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT