Benefits Of Meditation esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Meditation : मेडिटेशन म्हणजे काय? नियमित केल्यावर होणार ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मेडिटेशन केल्याने रोजच्या तणावातून आपल्याला जरा रिलॅक्स व्हायला मदत मिळते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Meditation : रोजची ऑफिसची गडबड, घरातील काम आवरण्याची घाई आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेकांचे आयुष्य तणावपूर्ण झाले आहे. हा तणाव घालवण्यासाठी आपण रोज नियमितपणे ५ मिनिटे तरी मेडिटेशन करायला हवे.

मेडिटेशन केल्याने रोजच्या तणावातून आपल्याला जरा रिलॅक्स व्हायला मदत मिळते. आपले मन आणि शरीर शांत होण्यास मदत मिळते. अनेक तज्ज्ञ हेल्दी आणि तणाव विरहीत लाईफस्टाईलसाठी नियमितपणे मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात.

आज आपण मेडिटेशन म्हणजे काय ? आणि मेडिटेशन करण्याचे फायदे  कोणते ? हे जाणून घेणार आहोत.

मेडिटेशन म्हणजे काय ?

  • मेडिटेशन किंवा ध्यान हे आपल्या मनशांतीसाठी आणि शरिरासाठी अतिशय महत्वाचे आहे. थोडक्यात आपले मन आणि शरीर रिलॅक्स होण्यासाठी हा सर्वात सोपा मानसिक व्यायाम आहे.

  • मेडिटेशनमध्ये एकाग्रता, विश्रांती, जागरूकता आणि लक्ष केंद्रित करणे यांचा समावेश असतो. ज्याप्रमाणे शारिरीक व्यायाम हे शरिरासाठी कार्य करते त्याचप्रमाणे मेडिटेशन हे आपल्या मनशांतीसाठी आणि शरिराला रिलॅक्स ठेवण्याचे कार्य करते.

  • मेडिटेशन हा मनाचा मानसिक व्यायाम आहे. मेडिटेशन करताना डोळे बंद करायचे असतात आणि शांत स्थितीमध्ये बसायचे असते.

मेडिटेशन करण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते ?

  • मेडिटेशन केल्याने मन आणि शरिर रिलॅक्स राहण्यास मदत मिळते.

  • नियमितपणे मेडिटेशन केल्याने झोपेच्या समस्या दूर होऊन शांत झोप लागते.

  • मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो.

  • मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि नैराश्य, निराशा यांसारख्या मानसिक स्थितींपासून आराम मिळतो.

  • फोबिया सारख्या आजारापासून दूर ठेवण्याचे काम मेडिटेशन करते.

  • मेडिटेशनच्या नियमित सरावामुळे रक्तदाब, मेटॅबॉलिजम सारख्या समस्या नियंत्रित करता येतात.

  • वजन कमी करण्याचे आणि थकवा घालवण्याचे काम मेडिटेशन करते.

  • रोज मेडिटेशनचा सराव केल्याने शरीरातील रक्तपुरवठा स्थिर ठेवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT