world heart day esakal
लाइफस्टाइल

World Heart Day: हेल्दी हार्टसाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण गरजेच; ‘हे’ खाद्यपदार्थ करतील मदत

हृदयाची काळजी घेताना आपण कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करतो जे आपण टाळायला हवं

सकाळ डिजिटल टीम

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आपण सर्वांनी नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. हृदयाची काळजी घेताना आपण कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करतो जे आपण टाळायला हवं.

जगभरात हृदयाशी निगडीत असलेल्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

हृदयाशी निगडित असलेल्या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने आज आपण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणाऱ्या काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.

या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवू शकता. चला तर मग कोणते आहेत हे खाद्यपदार्थ ? जाणून घेऊयात.

मासे

आहारात माश्यांचा समावेश करणे अतिशय महत्वाचे आहे. व्हिटॅमिन B12 चा नैसर्गिक स्त्रोत माशांमध्ये आहे. शिवाय, मासे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. कमी फॅट्स असलेले दूध, पनीर, आणि दही या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्यास डॉक्टर आवर्जून सांगतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीन्स, मटार, पालक, कोबी, भेंडी यांचा आहारात अवश्य समावेश करा. या भाज्यांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.

फळे

फळांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फायबर असते. सफरचंद, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी या तिन्ही फळांमध्ये पेक्टिन नावाचे कर्बोदक असते. हे कर्बोदक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

मोड आलेली कडधान्ये

मोड आलेल्या कडधान्ये खाल्ल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. या कडधान्यांमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. मोड आलेले मूग, हरभरे, राजमा आणि मटकी नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे, रोजच्या आहारात मोड आलेल्या या कडधान्यांचा जरूर समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT