World Press Freedom Day 2024 esakal
लाइफस्टाइल

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

World Press Freedom Day 2024 : लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी खास ओळख असलेली पत्रकारिता समाजात अतिशय महत्वाची भूमिका बजावते.

Monika Lonkar –Kumbhar

World Press Freedom Day 2024 : लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी खास ओळख असलेली पत्रकारिता समाजात अतिशय महत्वाची भूमिका बजावते. कारण, ही पत्रकारिता लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकण्यात किंवा लोकांची वैचारिक भूमिका बजावण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. लोकशाहीची खरी ताकद म्हणजे निष्पक्ष पत्रकारिता होय. त्यामुळे, जगभरात दरवर्षी ३ मे हा दिवस ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानाच्या कलम १९ मध्ये भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुलभूत हक्क आणि अधिकार देण्यात आले आहेत. या मुलभूत हक्क आणि अधिकाराद्वारे भारतातील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य सुनिश्चित केले जाते. आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्ताने आज आपण जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? आणि त्याचा इतिहास काय? हे जाणून घेणार आहोत.

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

प्रसारमाध्यमांबद्दल, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि त्याचा आदर ठेवण्याच्या वचनबद्धतेबद्दल देखील ओळखला जातो.   

लोकशाहीच्या मुल्यांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यात प्रसारमाध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे, जगभरातील सरकारने पत्रकारितेशी निगडित किंवा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचा इतिहास काय?

युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक माहिती विभागाने १९९१ मध्ये संयुक्तपणे ३ मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर, १९९३ मध्ये युनेस्को जनरल कॉन्फरन्सच्या २६ व्या अधिवेशनात या संदर्भातला प्रस्ताव स्विकारण्यात आला. खरे तर तेव्हापासून आजतागायत हा दिवस ३ मे रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT