Hatkanangle Loksabha Constituency Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

Hatkanangle Loksabha : 'हातकणंगलेची जागा मी सहज जिंकू शकतो, पण..'; राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

महाविकास आघाडीची अनेक धोरणे मला पटत नसल्याने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणवून घेण्यात मला रस नाही.

सकाळ डिजिटल टीम

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हे माझे होम पीच असून, मतदारसंघात मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी.

जयसिंगपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मला बाहेरून पाठिंबा द्यावा यासाठी मी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (ता. १६) मुंबईत भेट घेतली. मी त्यांच्या पाठिंब्यावर लढायला तयार आहे, पण त्यांचे ‘मशाल’ चिन्ह न घेता स्वाभिमानी पक्षातर्फेच लढेन, असे श्री. ठाकरे यांना सांगितले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली.

‘मला ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा पाठिंबा हवा असला तरी विकास आघाडी पक्षाचा घटक नसल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, ‘पाठिंब्याबाबत सकारात्मक बोलणी झाली आहे. हातकणंगलेची (Hatkanangle Constituency) जागा माझी पारंपरिक आहे. मी ही निवडणूक सहज जिंकू शकतो. अजून त्यांचेही जागा वाटप झाले नसल्याने अंतिम निर्णय झाला नसला तरी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडीची अनेक धोरणे मला पटत नसल्याने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणवून घेण्यात मला रस नाही. मी यापूर्वी २००४ पासून स्वाभिमानी पक्षावरच निवडणूक लढवली आहे. यामुळे ठाकरे यांच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हे माझे होम पीच असून, मतदारसंघात मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी येणाऱ्या काळात काम करणे सोयीचे होणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT