Sangli Loksabha : शिवसेना 'सांगली'साठी अडली; काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न, आता मदार केंद्रीय नेतृत्वावर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुणे, सांगली, माढा या तीन मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रात जागा वाटपात आघाडी घेतली आहे.
Sangli Loksabha
Sangli Loksabhaesakal
Summary

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत कॉंग्रेसने सांगली शिवसेनेला सोडण्यास तीव्र विरोध केला; मात्र शिवसेनेनेही आपला आग्रह कायम ठेवलाय.

सांगली : कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसाठी काँग्रेसला (Congress) सोडण्याच्या बदल्यात आम्हाला सांगलीच हवी, या मुद्द्यावर आजही शिवसेना (Shiv Sena) अडून बसली. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांसमोर पुन्हा त्या गोष्टीचा उच्चार करत सांगली आम्हीच लढवणार आहोत, असे सांगत कोंडी वाढवली आहे.

काँग्रेसने हा विषय पुन्हा एकदा ताकदीने रेटला. केवळ जागेच्या बदली जागा मागणे या मुद्द्यावर शिवसेनेने आडून न बसता भाजपला पराभूत करणे या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहावे, हा संदेश केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता अंतिम निर्णय काय होतो, याकडे लक्ष असणार आहे.

Sangli Loksabha
Kolhapur Loksabha 1967 : शेकापच्या उमदेवाराचा पराभव करून स्वातंत्र्यसैनिक शंकरराव माने झाले कोल्हापूरचे खासदार

दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), इच्छुक उमेदवार विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील मुंबईत तळ ठोकून होते. शिवसेनेने कितीही आग्रह केला, तरी आपण सांगली सोडणार नाही, तुम्ही चिंता करू नका, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा त्यांना आश्वस्त केले. खासदार राहुल गांधी यांची रविवारी मुंबईत जाहीर सभा होणार आहे. यावेळी ते उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी सांगलीच्या जागेबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sangli Loksabha
Sangli Loksabha : 'वसंतदादा-बाळासाहेबांच्या स्नेहबंधाची आठवण ठेवा'; दादांचे स्वीय सहायक हाप्पेंची ठाकरेंना साद

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुणे, सांगली, माढा या तीन मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रात जागा वाटपात आघाडी घेतली आहे. मात्र विकास महाआघाडीने अद्याप एकाही जागेवरचा उमेदवार अधिकृतपणे घोषित केलेला नाही. कोल्हापुरातून कॉंग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र आघाडीतील सांगली, हातकणंगले या जागांचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेने कोल्हापूरची जागा सोडल्याच्या बदल्यात सांगलीवर दावा केला आहे.

Sangli Loksabha
Kolhapur Loksabha : 'जुना राग काढण्याचा पवारांचा डाव, म्हणूनच शाहू महाराजांना उमेदवारी दिली'; मंडलिकांचा आरोप

सांगलीतून शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. मात्र काँग्रेसनेही सांगलीची जागा शिवसेनेला देण्यास तीव्र विरोध केला आहे. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश नेत्यांकडे सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी केली आहे. यासाठी हट्टही धरला आहे. प्रदेश कॉंग्रेस नेत्यांनीही सांगली आपणच लढवणार, अशी ग्वाही दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत कॉंग्रेसने सांगली शिवसेनेला सोडण्यास तीव्र विरोध केला; मात्र शिवसेनेनेही आपला आग्रह कायम ठेवला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथल यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सांगलीसाठी शिवसेनेवर दबाव टाकला. सांगलीची जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनीही शिवसेनेला सांगितले. त्यामुळे सांगली काँग्रेसच लढणार, हे जवळपास नक्की असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

Sangli Loksabha
Satara Loksabha : भाजपच्या दोन यादीत नाव नाही, उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार? राजे म्हणाले, बाकीच्या तिकिटाच मला..

राऊत-चंद्रहार चर्चा

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काल सकाळी खासदार संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असताना, शिवसेना काय भूमिका घेणार, याबाबत चंद्रहार यांनी राऊत यांच्याकडे चिंता व्यक्त केली. राऊत यांनी ‘तुम्ही कामात राहा, शिवसेनेने तुम्हाला शब्द दिला आहे’, असे सांगत आश्वस्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com