Ajit Pawar
Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : लोकसभा निवडणूक ही सत्त्वपरीक्षाच

सकाळ वृत्तसेवा

- पांडुरंग म्हस्के

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर (अजित पवार गट) असंख्य आव्हाने उभी आहेत. लोकसभेला जास्तीत जास्त जागा मिळवणे आणि पैकी बहुसंख्य जागा जिंकून दाखवणे हे सध्याच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान आहे. लोकसभेच्या कामगिरीवरच महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत जास्त वाटा मिळण्याची शक्यता आहे. एक विद्यमान खासदार असताना लोकसभेला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ते त्यामुळेच. त्याअर्थाने ही निवडणूक सत्त्वपरीक्षाच आहे.

बारामती मतदारसंघ जिंकणे ही फार मोठी जबाबदारी आहे. शरद पवार यांच्याशिवाय बारामती एकहाती लढविणे हे मोठे आव्हान आहे आणि त्याला ते पहिल्यांदाच सामोरे जात आहेत. यातून त्यांना आपले नेतृत्व सिद्ध करावयाचे आहे.

बारामतीच्या विजयावर त्यांचे व पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. प्रशासनावर उत्तम पकड असलेला, तसेच कार्यकर्त्यांबरोबर चांगला कनेक्ट असलेला नेता अशी अजित पवार यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचाही निकाल बारामतीच्या निकालासोबत लागणार आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला आहे. तांत्रिक कारणामुळे त्यांनी अद्याप अजित पवार यांचा पक्ष सोडला नसला, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरचे लोकसभा उमेदवार म्हणून त्यांनी प्रचार सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, तर अनेक आमदार निलेश लंके यांचा रस्ता धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या बरोबरच राष्ट्रवादी पक्ष न्यायालयीन लढाईलाही तोंड देत आहे. सुरुवातीच्या काळात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही तोच निकाल गिरवला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ताज्या सुनावणीत घड्याळ चिन्ह निवडणुकीपुरते अंतिम निर्णयाच्या अधीन राहून दिले असल्याचे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीला जाहिरात देऊन त्याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना केली आहे, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे.

शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार आणि सहका-यांनी पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. कर्जतच्या मेळाव्यात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा उल्लेख करत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सत्तेत सहभागी होऊनच आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवता येते, असे सांगत आपण शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी फारकत घेतली नसल्याचे स्पष्ट केले.

विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत सहभागी झाल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या जिजाऊच असल्याचे, तसेच छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असल्याचे सांगत त्यांनी आपली वैचारिक भूमिका कायम असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीच्या काळात शरद पवारांच्या सभा जिथे झाल्या त्याच ठिकाणी प्रत्युत्तरादाखल सभा घेण्याचा प्रयत्न अंगलट येत असल्याचे लक्षात येताच हा प्रयोग बंद करण्यात आला. पक्षवाढीसाठी मेळावे आणि यात्रा काढून जनतेपर्यंत पोचण्याचा मार्ग अवलंबला. त्याचाच भाग म्हणून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली.

महिलांचा मेळावा, अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घेऊन पक्ष सर्वसमावेशक असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी लतीफ तांबोळी या मुस्लिम कार्यकर्त्यांकडे देऊन शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण करणारा पक्ष असल्याचे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. युवकांना जोडण्यासाठी बालेवाडी येथे युवकांचा मोठा मेळावा घेण्यात आला.

वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आवाका वाढवण्याचा प्रयत्न केला. पक्षाकडे नेत्यांची मजबूत फळी आहे, कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. परंतु समोर शरद पवार नावाची भिंत आहे, ती ओलांडून पक्षाचा विस्तार करण्याचे आणि ओळख निर्माण करण्याचे आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT