Loksabha Election
Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : मुख्यमंत्री शिंदे आक्रमक, महायुतीत पेच ;भाजप आणि शिवसेनेतील चार जागांचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुसऱ्या टप्प्यातील मतदान आले तरीसुद्धा भाजप आणि शिवसेनेतील संघर्षामुळे महायुतीच्या चार जागांचा तिढा अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक बनल्यामुळे महायुतीतील पेच गंभीर वळणावर पोहोचला आहे. मागील तीन महिन्यांपासून लोकसभेच्या जागावाटपाची कसरत सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तीव्र मतभेद होतील, अशी शक्यता प्रारंभी व्यक्त केली जात होती.

परंतु सांगली, भिवंडीचा अपवाद वगळता आघाडीचे जागावाटप सौहार्दपूर्ण झाले आणि आघाडीने जागावाटप जाहीरही केले. उत्तर मुंबईचा अपवाद वगळता उमेदवारही जाहीर करून टाकले. याउलट महायुतीतील जागावाटप सहजपणे होईल, अमित शहा यांनी डोळे वटारल्यावर सगळे प्रश्न निकालात निघतील असे मानले जात होते. सुरुवातीला तशी परिस्थिती होती. परंतु सर्व्हेची भीती दाखवत भाजपने केलेल्या उमेदवार बदलाच्या आग्रहामुळे शिंदे गटातील आमदार, खासदार बिथरले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे यांनाही नंतर आक्रमक व्हावे लागले.

अमित शहा यांची सूचना असतानाही नाशिकची जागा भुजबळ यांच्यासाठी सोडण्यास शिंदे तयार झाले नाहीत. त्यामुळे भुजबळ यांना माघार जाहीर करावी लागली. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजपकडे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा असे मजबूत उमेदवार असतानाही शिंदे यांचा त्या जागेसाठीचा आग्रह कायम आहे. आधी तिथे मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा होती, आता यामिनी जाधव यांचे नाव पुढे आले आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात संजय निरुपम यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी तसेच मनसेच्याही तीव्र विरोधामुळे तेथील निर्णय होऊ शकलेला नाही.

उत्तर-मध्य मतदार संघ भाजपकडे असून आघाडीने तिथे वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेथून भाजपचे उमेदवार म्हणून आशिष शेलार, ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा असली तरी शेलार लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्यामुळे निर्णय होऊ शकलेला नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे नाव तेथून नव्याने चर्चेत आले आहे. उत्तर मुंबईसाठी काँग्रेसचा उमेदवाराचा शोध अद्याप सुरु आहे. नाशिकवरचा दावा ‘राष्ट्रवादी’ने सोडला नसला तरी हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्यातच तेथील स्पर्धा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT