Satara Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

दोन्ही राजेंची गळाभेट; पाटलांची 'दादाभेट'! साताऱ्याच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच; पवारांच्या उमेदवाराचीही घोषणा नाहीच

शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त (Shivendraraje Birthday) उदयनराजेंनी त्यांची घरी जाऊन गळाभेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

आणखी दोन दिवसांत भाजपची आठवी यादी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा : सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha) महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवारांची आजही घोषणा होऊ शकली नाही. खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) केंद्र व राज्यातल्या भाजपच्या नेत्यांशी संपर्कात राहून जोरदार तयारी सुरू केली आहे. काल शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त (Shivendraraje Birthday) उदयनराजेंनी त्यांची घरी जाऊन गळाभेट घेतली. उमेदवारी मिळणारच यावर उदयनराजेंचे समर्थक ठाम असतानाच आमदार मकरंद पाटील आज अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या पश्‍चात पाटील बंधू यावेळची उमेदवारी वाईकडे खेचून आणणार का, याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागलेली आहे. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सातारा, माढ्याचा समावेश केलेला नाही. त्यांच्याकडून इच्छुक असलेल्या चौघांपैकी कोणाचे नाव निश्चित होणार याची उत्सुकता आता ताणली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Constituency) उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांत रस्सीखेच सुरूच आहे. खासदार उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी संपर्क ठेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते सध्यातरी वेटिंगवरच आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप सातारा लोकसभेवरील आपला हक्क सोडलेला नाही. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मुंबईत बोलावून घेतले होते.

यावेळी दोन्ही नेत्यांत सातारा लोकसभेवरून चर्चा झाल्याचे समजते. नितीन पाटलांच्या उमेदवारीसाठी हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा, यासाठी मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे रेटा लावला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची पाच उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. यादीत बारामती, शिरूर, दक्षिण नगर, वर्धा, दिंडोरी या पाच मतदारसंघाचा समावेश आहे; पण शरद पवारांनी कालच्या बैठकीत एक-दोन दिवसांत साताऱ्याचा उमेदवार जाहीर होण्याचे संकेत दिले होते.

पण, पहिल्या यादीत सातारा व माढ्याच्या उमेदवारांचा समावेश नसल्याने सातारकरांची उत्सुकता आणखीनच ताणली आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर व सुनील माने या चार इच्छुकांपैकी कोणाच्या नावाला शरद पवार प्राधान्य देणार, की यापेक्षा वेगळाच कोणी उमेदवार असणार, याकडे राष्ट्रवादीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

अजून दोन दिवस प्रतीक्षा?

आणखी दोन दिवसांत भाजपची आठवी यादी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या वेळेस तरी सातारा व माढा मतदारसंघांतील उमदेवारांची नावे यादीत येतील, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT