Kolhapur Loksabha Election esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : शिव-शाहूंच्या विचारधारेने महाराज काम करताहेत, लोकसभेला त्यांना बळ द्या; संभाजीराजेंचं आवाहन

सर्वांना सोबत घेऊन काम कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.

सकाळ डिजिटल टीम

महायुती आणि महाविकास आघाडीचे ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ लोकसभा मतदार संघातील उमेदवार अद्याप अधिकृत जाहीर झाले नाहीत. तरीही संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचे नाव कॉंग्रेसकडून पुढे आले आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Loksabha Election) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना बळ द्या’, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केले. न्यू पॅलेस परिसरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, व शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते.

संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, ‘शिव-शाहूंच्या विचारधारेने महाराज काम करत आहेत. जनमानसात जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत सर्वश्रुत आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागणे आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन काम कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. ते शिस्तप्रिय असून, उत्तम मॅनेजमेंट गुरू म्हणून त्यांचा लौकिक आहे. जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना नेमकेपणाने जाण असून, ते सोडवण्याची ताकदही त्यांच्याकडे आहे.’

संयोगिताराजे म्हणाल्या, ‘सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारे महाराज आहेत. आता घरोघरी जाऊन त्यांचा जिल्ह्याच्या विकासाचा विचार पोहोचविणे आवश्यक आहे.’ यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, करणसिंह गायकवाड, हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर उपस्थित होते. फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. संजय पोवार यांनी स्वागत केले.

सोशल मीडियावरून प्रचाराची झलक

‘संकल्प बोलके हम तो निकल पडे.. हरद्वार खोलके गगनकहे... विजयी भव !’ या गीताची जोड घेवून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे सोशल मीडियावर जोरदार प्रदर्शन केले आहे. श्रीमंत शाहू महाराजांच्या नावे इन्स्टाग्राम, फेसबुकवरही अकाऊंट दिसत आहे.महायुती आणि महाविकास आघाडीचे ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ लोकसभा मतदार संघातील उमेदवार अद्याप अधिकृत जाहीर झाले नाहीत. तरीही संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचे नाव कॉंग्रेसकडून पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT