रिलस्टार धनंजय पोवार 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक? शरद पवारांची घेतली भेट, डीपींना पवारांनी दिला 'हा' सल्ला

रिलस्टार धनंजय पोवार (Reelstar Dhananjay Powar) ऊर्फ डीपी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
Reelstar Dhananjay Pawar met Sharad Pawar Mumbai
Reelstar Dhananjay Pawar met Sharad Pawar Mumbai esakal
Summary

एखाद्या रिलस्टारने थेट अशा प्रकारे उमेदवारीची मागणी करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही.

इचलकरंजी : इचलकरंजीचा प्रख्यात रिलस्टार धनंजय पोवार (Reelstar Dhananjay Powar) ऊर्फ डीपी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. चक्क त्याने मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Loksabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीची मागणी केली.

त्यांनी या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) नेत्यांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्यामुळे पुढील एक - दोन दिवसांत वरिष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Reelstar Dhananjay Pawar met Sharad Pawar Mumbai
Satej Patil : महायुतीचे उमेदवार ठरू देत, मग फासे कसे पडतील याची माहिती नाही; सतेज पाटलांचा नेमका कोणाला इशारा?

एखाद्या रिलस्टारने थेट अशा प्रकारे उमेदवारीची मागणी करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारीची रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे असे चित्र असताना काल इचलकरंजीतील रिलस्टार धनंजय पोवारने थेट सहकारी मित्रांसह मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

Reelstar Dhananjay Pawar met Sharad Pawar Mumbai
Kolhapur Loksabha : संजय मंडलिकांच्या भविष्याची मुख्यमंत्रीच काळजी घेतील; असं का म्हणाले धनंजय महाडिक?

या भेटीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपणास उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट करीत पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांशी भेटण्याचा सल्ला दिला. आपणही आवश्यक ते सहकार्य करण्याचा शब्दही त्यांनी त्याला दिला. दोन दिवसांपूर्वी त्याने उमेदवारीसाठी भेटण्यास येत असल्याचे शरद पवार यांना कळविले होते. त्यानुसार ही भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com