light bill
light bill Sakal
महाराष्ट्र

सोलापुरातील २.१३ लाख ग्राहक ‘महावितरण’च्या रडारवर! वीजबिल थकलेल्यांना राहावे लागणार अंधारात; शेजारून कनेक्शन घेतल्यास दोघांवरही कारवाई

तात्या लांडगे

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख आठ हजार वीज ग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख १२ हजारांहून अधिक ग्राहकांकडे देखील थकबाकी आहे. उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढत असल्याने महावितरणने थकबाकीदारांवर कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे.

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत देखील सुरू ठेवण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ९६० ग्राहकांकडे ३६ कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असून महावितरणने थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शेजारच्यांकडून वीज घेतल्यास कारवाई

थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर सुरू करणे कायद्याविरुद्ध आहे. तसा प्रकार आढळल्यास शेजारील ग्राहकासह व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

घरबसल्या ऑनलाइन बिल भरण्याचीही सोय

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

T20 World Cup 2024 : भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा पत्ता कट... 'ही' जोडी करणार ओपनिंग? वर्ल्ड कपपूर्वी भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad: ''स्टंटबाजी करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला''; अजित पवार गट आक्रमक

World Record : रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला, अवघ्या १५ तासात पोहोचली शिखरावर

SCROLL FOR NEXT