महाराष्ट्र बातम्या

गुजरातमधून 40 हजार मुली कुठं गेल्या? सामना अग्रलेखातून भाजपला खडा सवाल | Saamana Editorial

मागच्या पाच वर्षात गुजरातमधून ४० हजार मुली बेपत्ता झाल्याचा अधिकृत आकडा. भाजप काय करतंय?

दत्ता लवांडे

मुंबई : "द केरला स्टोरी" या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर भाजपकडून हा प्रोपागंडा चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. पण मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल ४० हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार आहे असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आलाय.

मुस्लीम तरूणांकडून हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यांना अफगाणिस्तान, इरान, सिरीयासारख्या देशांत पळून नेलं जातं असा उल्लेख या चित्रपटामध्ये केला आहे. पण सध्या गुजरातमधून बेपत्ता झालेल्या मुलींना न्याय कोण देणार? त्यांचा शोध कोण घेणार? असा सवाल करण्यात आला आहे.

"कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल नाही तर या मुलींचे पलायन किंवा अपहरणास नेहरू-गांधी कसे जबाबदार आहेत यावर मन की बाता बाती करून लोकांना गुमराह केले जाईल. या मुलींची पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला पर्वा नसेल तर त्यांना कोणत्याच प्रश्नांची चिंता नसेल असा याचा अर्थ होतो" अशा शब्दांत सामना अग्रलेखातून भाजपची कानउघडणी केली आहे.

"गेल्या पाच वर्षात गुजरातमधून ४० हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, हा नॅशनल क्राईम ब्युरोचा आकडा असून ही माहिती समोर आणल्यामुळे नॅशनल क्राईम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकतात. या अहवालाने गुजरातच्या राज्यकारभाराचे धिंडवडे निघाले आहेत."

"ज्या प्रकारे मोदींनी कश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरीला पाठिंबा दिला त्याप्रकारे गुजरातमधील ४० हजार मुलींवरील स्टोरीला ते पडद्यावर पाठिंबा देतील का? आज आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आंदोलन करत आहेत पण यावर कुणीच बोलायला तयार नाही."

"लव्ह जिहाद हा भाजपसाठी तणाव निर्माण करण्याचा हुकूमी एक्का आहे." अशा शब्दांत सामनामध्ये भाजपवर टीका करण्यात आली असून या मुली कुठं गेल्या असा परखड सवाल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

सलग दोन सुपरहिट हॉरर पट अन् पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स; दिग्दर्शक प्रीतम पाटील यांची बॉक्स ऑफिसवर हवा!

SCROLL FOR NEXT