Congress 
महाराष्ट्र बातम्या

हे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली; राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले यांची माहिती

रवींद्र देशमुख

मुंबई - नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. या घटनेविरोधात कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

राज्यात महिनाभर निरपराध लोकांचे जीव औषध न मिळाल्याने गेले. त्या प्रत्येक कुटुंबाला १० लाखाची मदत करावी अशी मागणी आम्ही राज्यपालाकंडे केली. हे सरकार बरखास्त करावं अशी मागणीही केल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हे दिवाळे निघालेले सरकार आहे. हे उधळपट्टी करत आहेत. जनतेचा कष्टाचा पैसा हे उधळत आहेत. भ्रष्टचाराने माखलेले हे सरकार आहे. यांनी सर्वसामान्यांचा खून सरकारी रूग्णालयात केला आहे. आम्ही राज्यपालांना सांगितले की, सरकारपासून संरक्षण करावे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

दरम्यान मलाईचा जुमला सुरू आहे. उच्च न्यायालयाने जे सुनावले. त्यामुळे राज्यपाल आणि न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT