महाराष्ट्र

निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे निकटवर्तीय राहुल कनाल तसेच संजय कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला. ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, याआधी देखील अशाप्रकारची आक्रमणे झालेली आहेत. ही दिल्लीची आक्रमण आहेत, असंही ते ठामपणे म्हणालेत. पुढे या कारवायांबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की, ही भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि थांबणार नाही, असंही ते ठामपणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रावर आधी देखील अशी आक्रमणे झाली आहेत. ही दिल्लीची आक्रमणे आहेत. आधी देखील इथे निवडणुका लागेल असं कळलं आणि महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली तेंव्हापासून असं सुरु आहे. हे यूपीमध्ये आणि हैद्राबाद आणि बंगालमध्येही असं झालं आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊन राहिलेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात हे सुरु आहे. या यंत्रणा म्हणजे भाजपच्या प्रचारयंत्रणा झालेल्या आहेत. मात्र, या प्रकारासमोर महाराष्ट्र झुकणार नाही, आणि महाराष्ट्र थांबणार नाही, असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.

यशवंत जाधव यांच्यावरील छापेमारीनंतर आता शिवसेनेच्या या निकटवर्तीयांवर ही छापेमारी सुरु असून काही कागदपत्रे तपासण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे आज शिवसेना नेते संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याआधीच अशा धाडी मारण्यात आल्यानंतर आता एकच खळबळ माजली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT