
'मातोश्री'च्या निकटवर्तीयांवर आयटी विभागाची छापेमारी
मुंबई: वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.
हेही वाचा: निकालापूर्वीच काँग्रेसचा यू टर्न; AAP, TMC सोबत युती करण्यास तयार!
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला. ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत. त्यांच्या मुंबईच्या घरी ही छापेमारी करण्यात आली असून राहुल कनाल मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात. यशवंत जाधव यांच्यावरील छापेमारीनंतर आता शिवसेनेच्या या निकटवर्तीयांवर ही छापेमारी सुरु असून काही कागदपत्रे तपासण्याचं काम सुरु आहे.
हेही वाचा: 'पटोलेजी केंद्राकडे राज्याचे कोट्यवधी थकित आहेत, त्याचाही हिशोब करूयात'
विशेष म्हणजे आज शिवसेना नेते संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याआधीच अशा धाडी मारण्यात आल्यानंतर आता एकच खळबळ माजली आहे. याबाबत आता नितेश राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढणारं ट्विट करत म्हटलंय की, राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. आमच्या 'आधिश'वर आणखी मोर्चा काढा. म्हणालो होतो की वक्त वक्त की बात है!
Web Title: Income Tax Department Raids Mumbai Pune Rahul Kanal Bajrang Kharmate Sadananda Kadam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..