Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत...', सदावर्तेंचं वादग्रस्त विधान!

गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वकतव्य करत टीका केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वकतव्य करत टीका केली आहे. त्याचबरोबर सदावर्तेंनी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही केलं आहे. यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नथूराम गोडसेचा उल्लेख करत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

"शरद पवारांचे विचार हे नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळी इतकेही नाहीत. गांधीजींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत", असं वादग्रस्त वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणालेत?

"नथुरामजींची अखंड भारताची भूमिका प्रत्येक हिंदुस्तानी काळजामध्ये ठेवून आहे. कुणाला सुद्धा भारताचे तुकडे पसंत नाहीत. आज सुद्धा तोच विचार आहे. गांधींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही असं मला वाटतं. अखंड भारताचाच विचार शिल्लक आहे."

"पाकिस्तान देण्याचा विचार शिल्लक नाहीय. म्हणून त्यांचा विचार काँग्रेसी कधीही संपवू शकत नाहीत. असे थातूर मातूर फुटक्या विचारांचे तर कधीच संपवू शकत नाहीत. त्यांची लायकीच नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजींच्या पायाच्या धुळीइतका सुद्धा नाही असं माझं स्पष्ट मत आहे," असं सदावर्ते यवतमाळमध्ये बोलताना म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, नथुराम गोडसेच्या विचारातील अखंड भारताचा विचार आजही भारतीयांच्या मनात असल्याचं ते म्हणालेत. आज महात्मा गांधींचे विचार म्हणून जे सांगितले जातात ते विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे असंही सदावर्ते म्हणाले आहे. तर काँग्रेस कधीच नथुरामच्या विचारांना संपवू शकत नाही असंही पुढे सदावर्ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT