Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या प्रयत्नानंतरही ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? ती पोस्ट तुफान व्हायरल

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात शिंदे गटाला यश

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. तर ही खिंडार पडण्याची खेळी यशस्वी झाल्याचे संकेत शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची अचानक बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकारी यांना 1 ते 2 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला होता.

अशातच राष्ट्रवादीला खिंडार पडू नये यासाठी अजित पवार यांनी पळापळ केली होती. अजित पवार यांनी खबरदारी घेतल्यानंतरही राष्ट्रवादीला खिंडार पडताना दिसत आहे. याचे संकेत शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. नरेश म्हस्के यांनी यासंबधी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठाण्यात सुटलाय तुफान वारा,12 तारखेला कुणाचे वाजणार बारा? अशा कवितेच्या ओळी असलेल्या पोस्ट नरेश म्हस्के यांनी केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ही कविता ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचा सूचक इशाराच दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची डोकेदुखी वाढणार आहे.

दरम्यान, ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात शिंदे गटाला यश आले असून ठाण्याचे अत्यंत ज्येष्ठ असणारे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांचे 4 सहकारी असे एकूण 5 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

तर जो नगरसेवक प्रामाणिक काम करतो त्याच्या कामाला अडचणी निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना कंटाळून राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादी सोडत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार आहे. आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत तुम्ही जे ठाण्यात काम करू शकलात ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच. याचं भान आपण ठेवा असंही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना अव्हॉईड करून बरेच नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. आव्हाड आणि त्यांच्या कंपूला कंटाळून ही मंडळी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळेच येत्या 12 तारखेला आम्ही त्यांचे बारा वाजवणार आहोत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT