Amol Kolhe : भाजपत प्रवेश करण्याच्या चर्चेला अमोल कोल्हेंचा पूर्णविराम, म्हणाले...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा
Amol Kolhe
Amol KolheEsakal
Updated on

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय ते भाजपत प्रवेश करतील, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सूरु आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील माझ्या भाषणनंतर पण अजूनही हा प्रश्न लोकांना पडत आहेत. जर तसं असेल तर लोकांनी माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावं. माझ्या संसदेच्या भाषणात “कभी खुशी कभी गम” आहे का? हे तुम्हाला कळेल, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या संसदेतील भाषणानंतर या वावड्या कमी झाल्या असतील असं मला वाटत होतं. राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी विरोधक सत्ताधारी असं काही नसतं. अनेक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजित पवार यांनी मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मांडलेल्या प्रकल्पांना मंजूरी दिली म्हणून राजकीय चर्चा किंवा पक्ष याला काही अर्थ नाही. भागाच्या विकासासाठी मी काम करत राहिलं असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Amol Kolhe
Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून खुली ऑफर

केवळ राजकारणाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे पाहू नका असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले आहेत. तर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भागातील 2 प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतली. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्यात चर्चा आणि गाठीभेटी होत असल्याने अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अमोल कोल्हे यांनी बोलताना या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

Amol Kolhe
Ajit Pawar : ''9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं, यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येईना"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Trump Announces Historic Iran Peace Breakthrough, Hormuz Strait to Reopen
Unique Political Devotion on Display in Shirdi as Six-Year Vow Comes to End
Birthday Gift for BJP’s Vivek Kolhe as He’s Nominated for Legislative Council
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
Marathi News Esakal
www.esakal.com