Sudha Murti Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sudha Murti: अखेर सुधा मूर्ती यांचं स्पष्टीकरण, मी संभाजी भिडे यांना ओळखतही नाही

तसंच सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचीही सांगलीत एका कार्यक्रमात भेट घेतली

सकाळ डिजिटल टीम

इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली इथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी कुरुंदवाडमधील त्यांच्या घराची पाहणी केली. तसंच सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचीही सांगलीत एका कार्यक्रमात भेट घेतली. तिथे सुधा मुर्ती या भिडे गुरुजींच्या पायाही पडल्या. याआधीच काही दिवसांपूर्वी टिकलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भिडे गुरुजी चर्चेत आले होते.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या पाया पडल्याचा सुधा मूर्तींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावेळी दोघांची चार ते पाच मिनिटं चर्चा देखील झाली होती. सुधा मूर्ती यावेळी मराठमोळ्या पेहरावात दिसल्या. याच घटनेवरून त्या चांगल्याच चर्चेत आल्या. सोशल मिडियावर सुधा मूर्ती यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

याबाबत प्रतिक्रिया देताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, मी त्यांना ओळखतही नाही. जेष्ठ व्यक्ति असल्यामुळे मी त्यांना नमस्कार केला असं त्या म्हणाल्या आहेत. सुधा मुर्ती या भिडे गुरुजींच्या पाया पडल्यामुळे जास्तच चर्चेत आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT