Vrushaliraje Bhosale Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजेंना राजघराण्यातील सदस्यांचं आव्हान?

उमेश बांबरे

'छत्रपती घराण्याच्या आदर्शाने तोच वारसा अखंडित पुढे चालू ठेवणार आहे.'

सातारा : छत्रपती सुमित्राराजे भोसले (Chhatrapati Sumitraraje Bhosale), चंद्रलेखाराजे भोसले (Chandralekharaje Bhosale) यांनी सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे चालवला. तसाच वारसा पुढे चालवण्यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे. सध्या राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नसल्याचे वृषालीराजे भोसले (Vrushaliraje Bhosale) यांनी आज स्पष्ट केले.

माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosle) यांच्या कन्या वृषालीराजे भोसले सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. क्रीडांगणाच्या अनुषंगाने विकासकामे करण्यासाठी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देऊन निधी देण्याची ग्वाही दोघांनी दिली होती.

त्यांनी नगरपालिका, राजवाडा व शनिवार पेठेतील बालविकास मंडळातर्फे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमास उपस्थितीत राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले क्रीडा सुंकल (शिर्के मैदान) येथे आयोजित बास्केटबॉल स्पर्धेचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. दरम्यान, वृषालीराजे म्हणाल्या, ‘‘माझ्या आजी सुमित्राराजे भोसले यांनी सामाजिक कार्यात अनमोल योगदान दिले आहे. समाजकार्यात सक्रिय राहात त्यांनी लोकांना अदालत वाड्यातून न्याय देण्याचे काम केले. आई चंद्रलेखाराजे यांनीही तोच वारसा कायम ठेवला. वडील शिवाजीराजे भोसले यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळत सातारा शहराच्या विकासात योगदान दिले, तसेच त्यांनी लोकोपयोगी काम केले. छत्रपती घराण्याच्या आदर्शाने तोच वारसा अखंडित पुढे चालू ठेवणार आहे. वडिलांचा आदेश मानून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राहणार आहे.’’

उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या पाठीशी

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) हे राजकारणात सक्रिय आहेत. बहीण म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सध्या राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. भविष्यात राजकारणात येण्याबाबत वेळ आली तर दोन्ही बंधूंच्या सल्ल्याने योग्य निर्णय घेऊ, असेही वृषालीराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT