Ahmednagar Violence Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ahmednagar Violence: मिरवणुकीवर दगडफेकीनंतर शेवगावमध्ये दोन गटात राडा; ४ जण जखमी

अकोल्यानंतर नगरच्या शेगावमध्ये दोन गटात तुफान राडा झाला, दोन गटाने एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना शेगावमध्ये घडली

सकाळ डिजिटल टीम

अकोल्यानंतर शेवगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. तर अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटाकडून दगडफेक केल्याची माहिती आहे.

तर दुसऱ्या गटाकडून सांगण्यात आलं आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक केली गेली. यामुळे अफवांमुळे दोन्ही बाजूकडून दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. जमावानं यावेळी वाहनांवरही दगडफेक केली यामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

शेवगावमधील दगडफेकीत चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी 102 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 50 अज्ञात व्यक्तींविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या सध्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हा वाद नेमका का सुरू झाला? याचं कारण पोलीस तापासानंतरच समजेल. सध्या शेवगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT